पान:सिंचननोंदी.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंचननोंदी - ७

कालवा चालविण्याची तंत्रे :
खालून नियंत्रण

 हाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एका विशिष्ट पद्धतीनेच आजवर आपण कालवे बांधत आलो आहोत. मागील सिंचननोंदीत आपण कालवा चालवण्याच्या ज्या वरून नियंत्रण' (अपस्ट्रिम कंट्रोल) तंत्राची चर्चा केली त्या तंत्रात पद्धतीत आकृती क्र. १ मध्ये दाखवल्याप्रमाणे कालवा - मरावाची पातळी ही तळाच्या उताराला समांतर असते. अगदी आडवे नियामक (क्रॉस रेग्युलेटर्स) वापरले तरीसुद्धा अशा कालव्यांना अंगभूत मर्यादा असतातच. उदाहरणार्थ-
१)कालव्यात एकदा सोडलेले पाणी वापरावे तरी लागते किंवा ते वाया तरी जाते. मध्येच कोठे तरी साठवता येत नाही.
२)सिंचन अधिकान्यांच्या सोयीने कालव्याच्या मुखाकडून सुरुवात करून अतिशय सावकाशरीत्या प्रवाहात बदल केले जातात.
३)त्यामुळे पाणी मागणी व पुरवठा यात फार तफावत पडते.
 म्हणजे, एक गोष्ट स्पष्ट आहे कालवे कार्यक्षमरीत्या चालवायचे असतील तर कालव्यात सोडलेले पाणी मध्ये कोठे तरी ठिकठिकाणी साठवता आले पाहिजे. असे पाण्याचे छोटे छोटे साठे जर निर्माण करता आले तर जेव्हा कालव्यातील पाणी नको असेल तेव्हा या साठ्यांमध्ये पाणी साठवता येईल. ते वाया जाणार नाही. पुन्हा जेव्हा लागेल तेव्हा पाणी त्याच साठ्यांमधून परत घेता येईल. पाणीसाठा जवळच उपलब्ध असल्याने पाणी द्यायला घ्यायला फारच कमी वेळ लागेल. मागणी व पुरवठा यातील तफावत कमी करता येईल.
 अशा प्रकारच्या साठ्यांना/ तलावांना सिंचन अभियांत्रिकी परिभाषेत सर्वसाधारणपणे इंटरमीजिएट / रेग्युलेटिंग / बॅलन्सिंग / नाईट स्टोरेजेस, असे म्हणतात. आपण त्यांना 'नियमन तलाव' असे म्हणूयात
.  कालव्याच्या बाजूने कालव्याला शक्यतो लागूनचं योग्य त्या ठिकाणी स्वतंत्ररीत्या 'नियमन तलाव' बांधणे हा एक मार्ग झाला. कालव्यातच जास्तीचे पाणी साठवून ठेवायची व्यवस्था करणे हा दुसरा मार्ग. असा 'कालवा साठा' (चॅनेल स्टोरेज) निर्माण करण्यासाठी आकृती क्र. दोनमध्ये दाखवल्याप्रमाणे कालवे बांधावे लागतात.
 या पद्धतीत स्वयंचलित (संगणक किंवा इलेक्ट्रॉनिक्स न वापरता फक्त जलयांत्रिकी पद्धत वापरून) आडवे नियामक वापरून कालव्याचे अनेक भाग पाडले जातात. प्रत्येक भागात कालवा भरावाच्या पातळीला उतार दिलेला नसतो. भरावाची पातळी त्या भागात एकच असते. अशा कालव्यांना लेव्हल टॉप (Level Top) कालवे म्हणतात. कालवामराव सलग उतरता न ठेवता त्याला आडव्या नियामकाजवळ पाय-या (ड्रॉप्स) दिल्या जातात.
 कालवा अशा प्रकारे लेव्हल टॉप करण्यामुळे 'कालवासाठा कालव्यातच निर्माण करता येतो, (आकृती क्र. २) 'कालवासाठा एकदा

३२