पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवहारावर भर दिला जातो. पण त्याचा उद्देश माणसास स्वार्थमुक्त करणे (परमार्थ) आणि त्याची आत्मशुध्दी जपणे हाच असतो. या सर्वांचे आकलन करून सांगता येईल की आशियातील संस्कृतीत आणि भारतीय संस्कृतीतही आत्मिक आणि आध्यात्मिक मूल्य संवर्धनाचे महत्त्व असाधारण असेच राहिले आहे, तेच तिचे बलस्थान आहे.


मोक्ष अथवा आध्यात्मिकतेचे महत्त्व

 आज अधिकांश मानववादी विचारवंतांमध्ये धार्मिक वा आध्यात्मिक मनोवृत्तीबद्दल संशयाची भावना आहे. युरोपातील प्रबोधन पर्वात हे मानले गेले आहे की, मानवतावादी मनोवृत्ती मूलतः बुद्धिवादी आणि सृस्यवादी (वास्तव्य/निसर्गवादी) भावनेच्या विरोधी आहे. असे मानले जाते तरी मानवतावादी वृत्ती ही इहलौकिक, शरीरी, इंद्रियापरक (Sensuous) होय. भारतीय विचारवंत या राजनीतिज्ञ मानवेंद्रनाथ रॉय आणि अमेरिकी लेखक कारलिस लेमांट स्वत:स व आपल्या मानवतावादास नैसर्गिकवादी (Naturalist) वा भौतिक वादी म्हणवून घेणे पसंत करतात. मार्क्सवाद्यांचे म्हणणे आहे की धर्म, मोक्ष, दुसरे, तिसरे काही नसून ती अफूची गोळी आहे. तिच्यामुळे बौद्धिकताच नष्ट होते. फ्रेजरसारखे मानववंशशास्त्री मानतात की, धर्म, मोक्ष, एक विचारपद्धती आहे आणि तिचा नजीकच्या भविष्यकाळात नि:पात झाला पाहिजे.

 मोक्ष आणि अध्यात्मासंबंधी वरील विचारधारांचे असे मत आहे की या मनोवृत्तीच्या भौतिकजगाशी सुतराम संबंध नाही. शिवाय ह्या विचाराचा मानवी प्रकृतीशी काही संबंध नाही. तर्कमूलक भाववादीही असाच काहीसा विचार व्यक्त करतात. परंतु माझे म्हणणे आहे की दार्शनिकदृष्ट्या (Metaphysical) चिंतनलोप अशक्य. त्याचप्रमाणे मोक्षधर्म वा आध्याकत्मिक वृत्तीचा लोप अशक्य आहे.

 डॉ. राधाकृष्णन् यांनी म्हटले आहे की, ‘मोक्षधर्म मादक द्रव्याचे कार्य तोपर्यंत करत नाही, जोवर त्यात अतृप्त आकांक्षा असत नाहीत. या आकांक्षा अर्थातच भौतिक असत नाही.२८ अभौतिक आकांक्षांचा अर्थ असा नाही की त्या मानव जीवनबाह्य आहेत. या गोष्टीचे आश्चर्य वाटते की विभिन्न प्रकारचे मानवतावादी विचारवंत मानवी शक्तींच्या योगदान आणि उपलब्धीबद्दल अभिमान बाळगूनही त्या आध्यात्मिक मनोवृत्तीच्या प्रकृती व

साहित्य आणि संस्कृती/५४