पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘यदि हम भारत के पुरातन काल के उस कर्मठ जीवन के बारे में जानना चाहते है, तो एशिया की मुख्य-मुख्य भाषाओं में अब भी मौजुद (उपलब्ध) बौद्ध साहित्य, तथा बृहत्तर भारत का इतिहास और भूगोल हमारी कूपमंडूकता दूर करने में सहायक हो सकता है आणि खरंच ‘बौद्ध संस्कृति' हा ग्रंथ वाचताना त्याची अनुभूती येत रहाते.

गौतम बुद्ध चरित्र

 डॉ. राहुल सांकृत्यायन यांनी या पुस्तकाच्या प्रारंभी गौतम बुद्धाचे चरित्र सांगितले आहे, ते सर्वपरिचित आहे. त्यानंतर त्यांनी बुद्धाचा धर्मविचार स्पष्ट केला आहे. त्या अंतर्गत बुद्धाची चार आर्य-सत्य त्यांनी विशद केली आहेत. १) दुःख २) दुःख हेतू ३) दुःख निरोध ४) दुःख निरोधाचे मार्ग. एका अर्थाने गौतम बुद्धाने मनुष्य जीवन सुखी करण्याचा मार्गच या सत्यांच्या द्वारे दाखवला आहे. या पहिल्या भागात बुद्धाचे समग्र तत्त्वज्ञान डॉ. सांकृत्यायन अत्यंत सोप्या भाषेत समजावतात. ते वाचत असताना मला अलीकडेच फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी लिहिलेले ‘सुबोध बायबल' (जुना करार आणि नवा करार) हे वाचलेले दोन खंड मनात रुंजी घालत राहिले. तीच सुबोधता नि तीच आत्मीयता. तुम्ही विषयाशी एकरूप झालात की वाचकही एकरूप होतो. या अध्यायात त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानांतर्गत क्षणिक वाद, प्रतीत्यसमुत्पाद, अनात्मवाद, अभौतिकवाद, अनीश्वरवाद, दश-अकथनीय (तत्त्व), विचार स्वातंत्र्य, असर्वज्ञता, निर्वाणादी बाबींवर वा तत्त्वांवर प्रकाश टाकला आहे. भारतात बौद्ध धर्माचा उदय नि त्याचा प्रचार, प्रसार अधोरेखित करत त्याची केलेली कारणमीमांसा या धर्माविषयीची महत्ता स्पष्ट करते तसेच व्हासाची चिकित्सा करतानाही त्यांचा वस्तुनिष्ठ नि वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट होतो. बौद्ध धर्माच्या पतन नि व्हासासंबंधी जनमानसात असलेले गैरसमज, भ्रम ते दूर करतात. यातून लेखनातील दायित्वाची जाणीव होते यावर भाष्य करताना ते लिहितात की, “बाहरी बौद्ध देशों में जहाँ उनकी बहुत आवभागत (स्वागत) थी, वहाँ (अपने) देश में उनके रंगे कपडे, मृत्यु के वारंट थे। यह कारण था, जिससे की भारत बौद्ध केंद्र बहत जल्दी बौद्ध भिक्खओं से शून्य हो गये।" (पृ. ६८). याच भागातील अन्य दोन प्रकरणातून डॉ. सांकृत्यायन यांनी श्रीलंका आणि ब्रह्मदेशातील धर्मप्रसाराची साद्यंत माहिती विशद केली आहे. त्यात हे सांगायला विसरत नाहीत की बौद्ध धर्माचा जगभर विकास होत असताना भारतात तो आक्रसत गेला यात भारतीयांची अदूरदर्शिताच कारणीभूत होती. तशीच आधुनिक काळात इंग्रजांची

साहित्य आणि संस्कृती/१३७