पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रभाव साहित्य, कलांवर अटळ असतो. भारतातील साहित्य और संस्कृतीच्या अभिन्न संबंधाची मुळं इथल्या पारंपरिक मानसिकतेत आहे. समन्वय भारतीय साहित्य व संस्कृतीची वृत्तीही आहे.

 ही झाली प्राचीन काळची गोष्ट. आधुनिक काळ आणि त्याचे साहित्य म्हणजे पाश्चात्त्य प्रभावाची प्रतिक्रियाच. विशेषतः यंत्रयुगाने व सुधारणावादी विचारांनी गेल्या शतकात भारतीय समाज मन बदलून टाकले. राष्ट्रीयता विचार प्राचीन साहित्यात आढळणार नाही. ती आधुनिकतेची देणगी व फ्रेंच राज्यक्रांतीची प्रतिक्रिया म्हणून पहाता येईल. या राष्ट्रीयतेतून इथली समाजरचना बदलली. 'इस राष्ट्रीयता ने जनता की सुरक्षा का प्रबंध करना शुरु किया। सुरक्षितता का अर्थ है सभ्यता की समृद्धि। यह सुरक्षा नाना रूपों में लोगों को मिलने लगी - चिकित्साशास्त्र के द्वारा, पुलिस और कोर्ट के द्वारा, म्युनिसिपल व्यवस्थाओं के द्वारा, ज्ञान-प्रसार के वाहक प्रेसों के द्वारा और इसी प्रकार अन्य विभागों द्वारा।"(विचार और वितर्क - पृ. १६१) भारतीय संस्कृती व साहित्याचा बदलांच्या संदर्भात विचार करताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की युरोपीय समाजात ते बदल दीर्घकाळाच्या पल्ल्यात स्वीकारावे लागतात, तेच आपणास केवळ दशका-दोन दशकांच्या कालावधीत आत्मसात करावे लागतात. त्याचे प्रमुख कारण सुधारणांमधील अंतर व गती होय.

 भारतीय संस्कृती व साहित्याचा पूर्वीइतका संबंध वर्तमानात राहिला नाही. वर्तमान साहित्यावर पश्चिमेचा प्रभाव काही अंशी अनुकरणावर येऊन ठेपल्याचं दिसतं. याची समीक्षा करताना आचार्य द्विवेदींनी स्पष्ट केले आहे की पश्चिम शब्द दिशा वा देशवाचक नसून तो विचारवाचक आहे. पौर्वात्य देश रहस्यमय, आध्यात्मिक व धार्मिक. उलटपक्षी पाश्चिमात्य देश व्यवसायी, ‘मॅटर ऑफ फॅक्ट', म्हणजे भौतिक. पण आज एके काळी ‘पूर्व असलेले पूर्व जर्मनी, जपान, रशिया थोडेच पूर्व राहिले. आज पश्चिम शब्द ‘आधुनिकता' संकल्पनेचा पर्यायवाची शब्द बनून गेला आहे, हे आचार्यांनी ज्या तार्किकतेने व विस्ताराने विशद केले आहे, त्यातून व्यासंग दिसून येतो.

 आज जगात काय दिसते तर मनुष्य एकाच गोष्टीचा विचार करू लागला आहे. ती म्हणजे मानवी मनाची शाश्वत वृत्ती वा धारणा. त्यामुळे भारतीय संस्कृती, भारतीय साहित्य या गोष्टी तशा गैरलागूच म्हणायला हव्यात. (किंवा संकुचित!) व्यापक अर्थाने साहित्य, संस्कृतीकडे कसे पाहायला हवे, हे समजावत आचार्य द्विवेदींनी विधान केलेय की, “हमें पूर्व या पश्चिम, भारतीय या अभारतीय आदि कृत्रिम विभाजनों के अर्थहीन

साहित्य आणि संस्कृती/११२