Jump to content

पान:सार्वजनिक मेळ्याची पद्यावली.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ हे प्रभो वाजवा मुरली, जी मधूर गीता स्फुरली, तो पुनरपि घूमवा नाद स्वांतत्र्य कलश उघडाया ॥ ७ ॥ ( तूं टांक चिरुनी मान ) हें ब्युराकसी सरकार, धोरणी फार गोड बोलुनि स्वैर चालवी, चहूकडे अधिकार ॥ धृ. ॥ चिरडिले कायद्याखालीं । राक्षसी हौस पुरविली । ही दडपशाही दंडेली पद २रें - चाल- -- शिक्षा सत्रा मधें बया ही किती बळी घेणार ॥ १ ॥ः पोटारी घेत जा चिमटा । घ्या करी भिक्षेचा लोटा | कायदा आमुचा सोटा | शिरजोरपणानें पुन्हां बोलती न्याय आम्हीं देणार ॥ २ ॥ थोतांड कायदा सोंग । वरकांति सर्व हे ढोंग । आंतले निराळे रंग । म्हणुनी कायदे भंग करोनी, तिला करा बेजार ॥ ३ ॥ अन्यायी कायदे मोडाः । बंधुनों श्वानपणसोडा । हे भूत दुहीचे गाड़ा । मग काय उणे हो, स्वराज्यदिनकर पळविल अंधःकार ॥ ४ ॥