या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
कै. ति. रा. गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक मेळ्याची पद्यावली. पद १ लें-चाल- -( सुनो सुनोजी मेरे यार ) ध्या प्रभो झणीं अवतार, असुरांसि संव्हाराया ॥ धृ. ॥ दुनियेचे पालनवाले, भक्तांचे चालनवाले, दुष्टांचे कर्दन काळ, हरि उठा उठा या समया ॥ १ ॥ भारती संकृती बुडली, व्यामोहे गुंगुनि गेली, असुरांची सत्ता आज, बैसली धर्म बुडवाया ॥ २ ॥ पाखांडि मतांची चलती, ही अधोगतीची बढती, तव भक्त माजले फार या झणी प्रभो या समया ॥ ३ ॥ ..कुरु क्षेत्रा वरले गीत, कोणी न आजला गात, जाहली कलीची मात, कशि झोंप घेतां सदया ॥ ४ ॥ ही भारत माता गाय, जाहली आज निःसहाय, होतसे, हिचा संहार, गोपाळ नाम तुजवाया ॥ ५ ॥ पळयाची वेळा आली, हरि धांवा संकट कालीं, ही योग्य वेळ तुम्हाला, अवतार झडकरी घ्यावा ॥ ६ ॥