पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पण तिचा विशेष फैलाव निरनिराळ्या संस्कृतीचे समाज एकत्र आले व संस्कृतिसंक्रमण होऊ लागले, म्हणजे विशेष आढळतो. हल्ली वर्तमानपत्रे, रेडियो व प्रवासाची साधने ह्यांमुळे जगातील सर्वच समाजांचे एकमेकांवर पूर्वी कधी नव्हे इतके आघात व प्रत्याघात होत आहेत. त्यामुळे उद्भवणारी प्रमाणशून्यता आशियाई राष्ट्रांमध्ये विशेष ठळकपणे दिसून येते; पण इतरही राष्ट्रांत थोड्याबहुत अंशाने ती दिसते. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात बहुतेक सर्व जमातींतील स्त्रिया नऊवारी लुगडे नेसत असत. सध्या लुगडे कोणत्या पद्धतीने नेसावे, लुगडे नेसावे की फ्रॉक घालावा की विजारी घालाव्या, ह्याबद्दल सर्वमान्य नियम नाही. पुरूषांच्या बाबतीतही असेच दिसून येते. नवीन पिढीत धोतरे नेसणारे, गंध लावणारे पुरूष हल्ली क्वचितच दिसतात; पण धोतर किंवा पायजमा किंवा सुरवार किंवा इंग्रजी पद्धतीची लांब वा आखूड विजार, व तीवर साधा अंगरखा, शर्ट असे पोषाखाचे प्रकार दिसतात. फक्त वस्त्रासारख्या क्षुल्लक बाबतीतच असे आहे असे नसून खाणेपिणे, बालणे-चालणे, सांप्रदायिक आचार व सर्व त-हेचे विचार यांत एकाच समाजात एकाच काळी प्रचंड विविधता दिसते आहे. हीही एक प्रकारची अमाणशून्यताच आहे. समाजरचना झपाट्याने बदलत आहे; त्या बदलाचेच है एक चिन्ह आहे. या सर्वमान्य वागणुकीला काही मोल आहे; व ते मोल निरनिराळ्या त-हांनी अत्ययास येते. सर्वमान्यत्व ही गोष्ट इतकी मोलाची आहे की, तीसाठी माणूस वाटेल ते करावयास तयार होतो. 'सासवेचे बोल ऐकल्याने काय जात । माहेराचे नाव होते ।' ह्या अगदी घरगुती भावनेपासून तो 'कीर्तिरूपे ण्या' च्या इच्छेपर्यंत सर्व काही त्यात येते. नुसते नावच होते असे नव्हे, र अशा वर्तणुकीसाठी समाज काही काल्पनिक अदृश्य, तर काही लौकिक रय अशी बक्षिसेही देऊ शकतो. स्वर्ग. मोक्ष, व्यवहारात प्रतिष्ठा व त्याबरोबरच पता अशी ती असतात. ह्या उलट भोवतालच्या समाजाला नावडणारी 'य कली, तर नाक मुरडणे, छी-थू होणे, त्यांखेरीज काही काल्पनिक व काही इंद्रियगोचर दश्य अशा शिक्षाही समाज करू शकतो. सर्व समाजात ।। संस्कृती ।। ७५