पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वतःच्या जातीच्या सोडून इतर कोणत्याच जातीच्या चालीरिती ब्राह्मणांनी दिलेल्या असण्याचा संभव नाही, याची जाणीव ठळकपणे दिसणा-या बाबींकडे ठळकपणे लक्ष देणा-या विचारवंतांना असण्याचा संभव कमी होता. मधूनमधून इरावतीबाईंनाच स्वतःच्या भूमिकेचा विसर पडतो, एवढा पाश्चात्य संशोधकांच्या लेखनाचा भारतीय मनावर सर्वत्रच परिणाम आहे. एकदा इरावतीबाईही असे लिहून जातात की, सर्व भारत इतिहासकाळात कधाच एकच्छत्री अमलाखाली नव्हता; म्हणून भारतीय समाजजीवनात पराकाटीचा विस्कळीतपणा आणि परस्परभिन्नता जाणवते. बाईंचे हे म्हणणे लताच चुकीचे आहे, ही गोष्ट उघड आहे. सर्व भारत एकच्छत्री कधीच हता. पण वेळोवेळी वेगवेगळे प्रदेश एका छत्राखाली नांदत होते, इतके खर आहे. एका राजवटीत एका छत्राखाली दीर्घकाळ नांदणा-या प्रदेशातसुद्धा जातीची समाजरचना व कुटुंबरचना एकसारखी कधीच नव्हती. छत्र 7 असो, की मोठे असो, प्रत्येक छत्राखाली नेहमीच भिन्नभिन्न समाजरचनेचे वावरत होते; म्हणून जरी भारतावर एकच्छत्री राज्य काही शतके चालले असते, तरी रचनांची भिन्नता कमी झाली नसती. प्रश्न एका छत्राचा ला; तसा तो एका धर्माचा नाही, किंवा एका प्रदेशाचाही नाही. एकाच सात, एकाच छत्राखाली, एकच भाषा बोलणारे एकाच धर्माचे अनुयायी ला कमाल भिन्नता टिकवून आहेत, हा खरा प्रश्न आहे. कारण कुणीच या कुलधर्मात हस्तक्षेप करण्याचा संभव नाही. ज्या ब्राह्मणांना आपलीही उपरचना देशभर एकसारखी करिता आली नाही, त्यांच्या पदरी सर्व रचनेचे पापपुण्य बांधणे सोयीचे असले, तरी सत्य खासच नाही. पला समाजरचना चांगली असेल, तर तिचेही कर्ते जसे ब्राह्मण नव्हते, " समाजरचना वाईट असेल, तर तिचेही कर्ते ब्राह्मण नव्हते. स्वतःच्यातरी रचनचे कर्ते ब्राह्मण आहेत काय, हाच मुळात संशयाचा परंपरागत समाजरचनेच्या चिंतनात वर्णव्यवस्थेला फार मोठे महत्त्व ह. ह्या वर्णव्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना फार मोठे महत्त्व ९. सगळे अधिकार या तीन वर्णाचे; विशेषतः, सत्ता आणि मत्ता तीन ।। संस्कृती ।। १२९