पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उलगडा त्यांचाच आहे. त्या व्यवस्थेचे पुरेसे विवरण त्याआधी उपलब्ध नव्हते. हा व्यापक आढावा समाजरचनेच्या कोणत्या सूत्रांपर्यंत घेऊन जातो, याचेही विवेचन त्यांनी केले. बाईंनी भारतातील नातीगोती आणि सोयरसंबंध यांचा जो विचार केलेला आहे, तो या पद्धतीचा नुसता पहिलाच विचार नाही; तर तो पहिलाही आहे. आता अधिकृत व प्रमाण म्हणून मान्यही ठरला आहे आणि हळूहळू हिंदूंच्या समाजरचनेच्या नव्या स्पष्टीकरणाचा हा ग्रथ जन्मदाताही ठरण्याचा संभव आहे हे लक्षात घेतले, तर समाजशास्त्रीय लिखाणात इरावतींच्या लिखाणाने एक नवा कालखंड सुरू झाला आहे, हे लक्षात येणे फारसे कठीण जाऊ नये. हटनने असे म्हटले आहे की, समाजशास्त्रात शारीरिक रचनाविवेचनशास्त्र माण सामाजिक-सांस्कृतिक विवेचनाचे शास्त्र असा दुहेरी अधिकार ज्या फार थोड्या संशोधकांच्या ठिकाणी आहे, त्यांपैकी इरावतीबाई या एक आहत. एकेका विभागाच्या तज्ज्ञतेच्या त्या काळात तज्ज्ञता आणि चौरसपणा पाचा दुर्मिळ संगम इरावतींच्या ठिकाणी झाला होता, हे हटनला अभिप्रेत जसणार एक सत्य दिसते. आपल्या पिढीला अज्ञात असणा-या नवभारताच्या पजागृतीच्या प्रतिनिधी बाई आहेत, असेही हटनला वाटते. सहजगत्या उल्लेख करून जातो की. ठळकपणे नजरेत न भरणा-या पण समाजाच्या पला कारक ठरणा-या बाबींवर भर देण्याची लेखिकेची पद्धत आहे. हटनने उल्लेखिलेला हा मद्दा हा इरावतींचे वैचारिक लिखाण वाचताना पचारात घेण्याजोगा सर्वात महत्त्वाचा मद्दा आहे. ठळक बाबी ठळकपणे सवानाच दिसतात. जे ठळकपणे दिसते ते सत्य नसतेच, असे म्हणण्याचे कारण नाही; पण जे ठळकपणे दिसत नाही, ते अधिक महत्त्वाचे सत्य या सभव असतो. ठळकपणे न दिसणा-या पण अधिक मूलभज्ञ नणा-या सत्यकणांचे दर्शन घडविण्यासाठीच त्या त्या शास्त्रातील मारवंतांची खरी गरज असते. ठळक बाबींवर भर देणा-यांनी केलेल्या चाडचुका व त्यांचे राजकीय परिणाम पाहिले, म्हणजे असे वाटू लागते की, चाइनी ठळक नसणा-या बाबींकडे लक्ष वेधण्याची जी धडपड केली, तीच ।। संस्कृती ।। १२७