पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

MMMMMM द्वितीयावृत्तीविषयीं दोन शब्द प्रस्तुत सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ इ. स. १९२८ सालीं कै. बाळकृष्ण अनंत भिडे, वी. ए. यांनीं तयार केला आणि रा. केशवराव ढवळे यांनीं तो प्रसिद्ध केला. प्रथमावृत्तीच्या चार हजार प्रति छापण्यांत आल्या होत्या आणि त्या गेल्या सहा वर्षांत संपून गेल्या, यावरून, सांप्रदायिकतेचा छाप नसलेली सार्थ ज्ञानेश्वरीही लोकांच्या आश्रयास पात्र होऊं शकते, हैं उत्तम प्रकारें सिद्ध होत आहे. या सार्थ ज्ञानेश्वरीस संप्रदायाचें पाठबळ नाहीं अशी प्रच्छन्न टीका करणारांनी एक गोष्ट लक्षांत घ्यावयास पाहिजे ती ही कीं, अर्थ लावणारा सांप्रदायी असो वा असांप्रदायी असो, त्याला, ज्ञानेश्वरींतील मूळ ओव्यांचा जो सरळ अर्थ होईल तोच द्यावा लागणार; ज्ञानदेवांच्या शब्दाबाहेर जाण्याचा कोणालाही अधिकार नाहीं. ज्ञानदेवांनीं साडेसहाशे वर्षांपूर्वीच्या जुन्या मराठी भाषेत पद्यरूपानें जें काय सांगितलें आहे, तें अभ्यासानें समजून घेऊन, तेंच हल्लींच्या चालू मराठी भाषेत गद्यरूपार्ने सांगण्यापलीकडे, सांप्रदायी मनुष्यास किंवा असांप्रदायी मनुष्यास, जातांच येणार नाहीं, आणि जो जाईल त्यानें आपल्या अधिकाराचें अतिक्रमण केलें असें म्हणण्यास बिलकुल प्रत्यवाय नाहीं. खुद्द ज्ञानेश्वरमहाराजांनीं, आपला ग्रंथ आपण सांप्रदायिकांसाठींच लिहीत आहोंत व इतरांस तो समजणारच नाहीं, असें कोठेही लिहिलेलें नाहीं. उलट, त्रैवर्णिकांच्या कानीं लागलेल्या वेदानें ज्यांच्यावर बहिष्कार पुकारला आहे त्या स्त्री-शूद्रादिकांसाठीं भगवान् श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गीताग्रंथावर मराठी भाष्य लिहिण्यांत आपला उद्देश, मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांस हैं गीताज्ञान सुलभ करून द्यावें, हाच आहे असें त्यांनीं स्पष्ट सांगितलें आहे. मग सांप्रदायाच्या गाळण्यांतून हे ज्ञानामृत गाळून घ्या असें ते कसे सांगतील ? आणि त्यांनीं जर स्वतः तसें सांगितलेलें नाहीं तर सांप्रदायाचें बुजगावणे उभे करून भोळ्याभावड्यांस भेडसावण्यांत पुरुषार्थ कोणता ? आणखी एक गंमत अशी कीं, सांप्रदायिकांनीं तयार केलेल्या सार्थ ज्ञानेश्वरीच्या प्रती आणि प्रस्तुत असांप्रदायिक प्रत यांतील बहुतेक ओव्यांच्या अर्थात म्हणण्यासारखा फरक क्वचितच दृष्टीस पडेल. आतां कांहीं ओव्याच अशा बिकट आणि दुर्बोध आहेत कीं, त्यांच्या वास्तवार्थासंबंधानें मात्र मतभेद होणें शक्य आहे व तसा तो सर्वच प्रतींत झाल्याचे आढळतें. ज्ञानेश्वरीचा, सांप्रदायिक म्हणून जर कांहीं विशिष्ट अर्थ असता तर सर्व सांप्रदायी सार्थ ज्ञानेश्वरींच्या प्रतीत सर्वत्र एकच अर्थ आढळावयास पाहिजे होता. पण तसा तो आढळत नाहीं, व यावरून सांप्रदायी आणि असांप्रदायी हा केवळ नांवाचाच भेद आहे हें ओघानेंच सिद्ध होतें. असो. हा ग्रंथ पहिल्यानें छापला त्यानंतरच्या सहा वर्षांत बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आहेत. पहिली गोष्ट ही कीं, प्रस्तुत सार्थ ज्ञानेश्वरी ज्या विद्वान् गृहस्थांनी तयार केली ते श्री. बाळकृष्ण अनंत भिडे आतां हयात नाहींत, सुदैवानें ने विद्यमान असते व त्यांचा हात या द्वितीयावृत्तीवरून एकदां फिरला असता तर पहिल्या आवृत्तींतले अल्पस्वल्प दोष त्यांचे त्यांनीच काढून टाकले असते, परंतु तसा योग नव्हता, म्हणून ती कामगिरी प्रकाशकांनी MANKONANTENNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNN NNNNNNNNNNNNME