पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०५ ताभिः = ताभिर्वडवाभिः यद्वा ताभिः [ तरुगुल्मादिरूपाभिः ] स्त्रिभिः, त्या अश्वयोषितांनी अथवा तरुगुल्मादिरूप स्त्रियांनी. सयुक्=स्वयमेव युज्यमानः सरथं=समानं एकं रथं [ आरुह्य ]. " आरुह्य" हैं अध्याहृत आहे. देवः = दीप्यमानः वायुः . ईयते - गच्छति. विश्वस्य = सर्वस्य. भुवनस्य=भूतजातस्य. राजा=स्वामी. ह्यापुढे " भवति " हैं क्रियापद अध्याहृत ध्यावें. प्रथम चरणाचा मराठी अर्थ - [ पर्वतादि ] स्थावर पदार्थ ( विष्ठाः ) हे, वायूच्या अनुरोधानें ( वातस्य अनु ) ह्म० जिकडच्या बाजूला वायु वाहतो तिकडच्या बाजूला कंपायमान होतात. दुसऱ्या व तिसऱ्या चरणाचे दोन अर्थ होऊं शकतात. ते असे- - १ मराठी अर्थ - एकाया संग्रामाला जावें त्याप्रमाणे ( समनं न ) ह्या [ वायू ] कडे ( एनं अश्वयोषिता • घोडया ( योषा:= अश्वयोषितः ) येतात ( आगच्छन्ति ). त्यांनीं स्वतःच आपल्याला ज्याच्या रथाला जोडून घेतलें आहे असा ( ताभिः सयुक् ) [ हा ] देदीप्यमान वायु ( देवः ) एकाच रथावर [ आरूढ होऊन ] ( सरथं) गमन करितो ( ईयते ). २ मराठी अर्थ - ज्याप्रमाणें कामिनी स्त्रियांनीं [ एकाद्या ] कामी पुरुषां- कंडे अभिगमन करावें ( योषाः समनं न ) याप्रमाणे [ तरुगुल्मादि रूप स्त्रिया ] ह्या [ वायूकडे ] अभिगमन करितात ( आगच्छन्ति ). त्या [ तरुगुल्मादि- रूप स्त्रियांनीं ] युक्त होत्साता ( ताभि: सयुक् ) [हा] देदीप्यमान वायु ( देवः) एकाच रथावर (सरथं ) [ आरूढ होऊन ] गमन करितो (ईयते ). चवथ्या चरणाचा मराठी अर्थ - [ हा वायु ] ह्या सर्व भूतसमुदायाचा ( विश्वस्य भुवनस्य ) स्वामी [ होतो ] ( राजा ).