पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनुष्य, एकीकडे सर्वशास्त्रपारंगत असा विद्वान् व दुसरीकडे एका शाळेतील एक पंतोजी, एकीकडे आपल्या देशाकरितां तनमनधन खर्च करणारा एक उदारात्मा पुरुष व दुसरीकडे उदरनिमित्त परक्या देशांत जाऊन राहणारा एक साधारण मनुष्य अशी ही दोघांची जोडी पाहिली ह्मणजे जगत्त्रय निर्माण करणारा भगवान् ब्रह्मदेव व घट निर्माण करणारा कुम्भकार ह्यांच्या संग्रामाविषयी वर्तविलेलें भविष्य खरें होण्याचे दिवस जवळच आले असे कोणास वाटणार नाहीं बरें?