पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९९ लोकांशी ] मी [च] संग्राम ( समदं ) करितें ( कृणोमि ). मी [च] द्यावा- पृथिवीमध्ये प्रविष्ट होऊन राहिले आहे ( आविवेश प्रविष्टवती ). ऋचा ७ वीः- ही ऋचा अवघड आहे. सुषे=प्रसुबे, जनयामि. पितरं = दिवं. - अहं पितरं सुवे = अहं दिवं [ आकाशमित्यर्थः ] जनयामि, मी आकारा उत्पन्न करितें. ह्यास आधार " आत्मनः आकाशः संभूतः " ह्या श्रुतीचा आहे. अस्य=अस्य परमात्मनः, यद्वा अस्य भूलोकस्य. मूर्धन = मूर्धनि, उपरि परमात्म्यावर मी आकाश उत्पन्न करितें, असें वाक् ह्मणतें. त्याचा अर्थ असा आहे - आकाशादि हें सर्व कार्य आहे व पर- मात्मा हैं कारण आहे. तेव्हां ज्याप्रमाणें, तन्तु हैं कारण व पट हें कार्य अस- ल्यामुळे तन्तूवर पट उत्पन्न झाला असें ह्मणण्यास कांहीं हरकत नाहीं, कारण, वास्तविक पहातां तें खरेंच आहे; याचप्रमाणे परमात्मा ह्या कारणावर आका- शादि कार्य उत्पन्न होते असें ह्मणण्यास काही हरकत नाहीं , मम योनिः (१) मम करणं [ मम कारणभूतं चैतन्यं ] अर्थ एकच आहेत. = (२) मम कारणं [ मम कारणभूतः अम्भृणाख्यः ऋषिः . ] = (३) मम कारणं [ मम कारणभूतं चैतन्यं. ] हा व पहिला अप्सु = (१) ब्यापनशीलासु धीवृत्तिषु. = (२) उदकेषु. त्यांच्यामध्ये. = (३) अम्मयेषु देवशरीरेषु, पाण्याची बनलेली जी देवशरीरें अन्तःमध्ये.