पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९६ मराठी अर्थ- दुसरा व तिसरा चरण प्रथम घ्यावा. ज्यानें ( यत् ) [ मनाला ] संतुष्ट करणारें असें ( राधसः = संराधकस्य ) पुष्कळ (महः ) धन (रायः) आह्मांला (नः) दिलें ( ददत् ), स्तवन करणारा पुरुष (अर्चत : ) करीत असलेल्या स्तोत्राचें ( ब्रह्मकृति ) जो ( य: ) अतिशय काळजीनें रक्षण करितो ( अविष्ठः ) ० स्तोत्राचा अतिशय आवडीनें जो स्वीकार करितो [ अशा त्या ] धनसंपन्न ( मघवानं ) इन्द्रांचे [ आह्मी ] स्तवन करूंच ( वोचेम इत् ), [ विसरणार नाहीं. ] तुह्मी [ आमचें ] रक्षण करून आमचें सर्वदा पालन करा. ऋचा १ ली:- मंडल ७ सूक्त ४९. ( पीटर. नं. १९.) " समुद्रज्येष्ठाः=समुद्रः अर्णवः ज्येष्ठः प्रशस्यतमः यासां अपः ताः, समुद्र आहे ज्येष्ठ ज्यांमध्यें असें [ जल ]. हें " आपः " ह्याचे विशेषण आहे. " आपः हा शब्द पहिल्या दोन चरणांत अध्याहृत घ्यावा. सलिलस्य=अंतरिक्षस्य. अंतरिक्षनाम एतत्. सलिलस्य मध्यात् = अंतरिक्षस्य माध्यमिकात् स्थानात्. अंतरिक्षाच्या मध्यापासून. पुनानाः = [ विश्वं ] शोधयन्त्यः. यन्ति गच्छन्ति. अनिविशमानाः = सर्वदा गच्छन्त्यः. याः = या निरुद्धाः अपः. वज्री = वज्रभृत्. वृषभ: = [ कामनां ] वर्षिता.