पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वृषभ :- अपां वर्षिता, रेतःउदकं. दधाति = स्थापयति. ६६ गर्भ गर्भस्थानीयं. हैं " रेतः " ह्याचे विशेषण आहे. मराठी अर्थ - [ हे स्तोत्या ! ] गर्जना करणारा ( कनिक्रदत् ), [ज- लाचा] वर्षाव करणारा [व] दान लवकर करणारा ( जीरदानुः ) असा [ जो पर्जन्य ] औषधींच्या ठिकाणीं, जसा गर्भ स्थापन करावा त्याप्रमाणे, उदक स्थापन करितो ( रेतो दधाति ), [ अशा त्या ] बलवान् ( तवसं ) पर्ज- न्याच्या समीप प्राप्त होऊन ( अच्छ ) [ तूं त्याची ] प्रार्थना कर ( वद ), या स्तोत्रांनी ( गीर्भिः ) [ त्याचें ] स्तवन कर, [ आणि हवरूप ] अन्नानें (नमसा ) त्याची सर्वत्र सेवा कर (आविवास = सर्वतः परिचर ). ऋचा २री:- विश्वं भुवनं = सर्वाणि भूतानि. बिभाय = बिभ्यति. महावधात् = महान् वधः यस्य तस्मात्. अनागा:-अनपराधः ईषते = [ भीतः ] पलायते. वृष्ण्यावतः = वर्षकर्मवतः, दुष्कृतः = पापकृत:. मराठी अर्थ - हा वृक्षांचा नाश करितो ( विहन्ति ) व राक्षसांना मारून टाकतो. सर्व भूतें (विश्वभुवनं ), ज्याचें शस्त्र फार मोठें आहे अशा ( महावधात् ) [ ह्या पर्जन्या ] पासून भय पावतात ( बिभाय ). आणखी शिवाय ( उत), जेव्हां ( यत् ) पर्जन्य हा पापी लोकांचा ( दुष्कृतः ), गर्जना करीत ( स्तनयन् ), वध करितो, [ त्या वेळ] ज्यानें कधीं अपराध केला