पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विरंगुळा, जीवनबदल, जिवाभावांच्या नातलगांना भेटता येणे दुरापास्त झाले आहे.
 घरात वयोश्रेष्ठांची काळजी घेणारे मनुष्यबळ पूर्वी एकत्र कुटुंबात उपलब्ध असायचे. विभक्त कुटुंबांचा प्रसार, शहराकडे नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने स्थलांतर यांमुळे भारतातील महानगरांतील वयोश्रेष्ठ व खेड्यांतील वयोश्रेष्ठ यांच्या एकटेपणात, निराधारत्वात समानता येणे हे या देशाच्या समग्रतः नागरीकरणाचे लक्षण होऊ पाहत आहे. खेड्यातील वयोश्रेष्ठांकडे पाहण्याचा कमवत्या व कत्र्या पिढीचा दृष्टिकोन उपेक्षेचा व ओझ्याचा बनतो आहे. त्यामुळे ग्रामीण वयोश्रेष्ठांचे अबोल होणे, एकलकोंडे होणे, मनोरुग्ण होणे वाढते आहे. अपेक्षित सोयी, सुविधा, साधनांच्या अभावी येणारे नैराश्य त्यांचे आयुष्यमान घटवत आहे. वाढती असुरक्षिततेची भावना व उपेक्षेची वाढती जाणीव यातून जीवन वैयर्थ वाढते आहे. जमीनदार असून मजुराचे जीवन जगावे लागण्याच्या जाणिवेने सतत आजारी असणे, कुरकुर, कुरबुरीचे जीवन जगणे वयोश्रेष्ठांना अनिवार्य झाले तरी आता मात्र ते सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे. यातून ग्रामीण भागातील वयोश्रेष्ठांना आपण दुय्यम दर्जाचे असल्याची होणारी जाणीव अधिक क्लेशकारी बनली आहे. त्यांच्या अशिक्षित व अल्पशिक्षित असण्यानेही ग्रामीण वयोश्रेष्ठ वर्तमान आधुनिकतेशी जुळवून घेण्यात स्वत:ला असमर्थ अनुभवत आहेत. त्यातून एक प्रकारचे कालबाह्य जीवन ते जगत असल्याची त्यांच्या मनातील अव्यक्त जाणीव त्यांना शल्यकारी व्यक्तीचे जिणे बहाल करीत आहे. विधवा, विधुर स्त्री-पुरुषांचे जगणे अन्यापेक्षा अधिक उपेक्षेचे, वंचित झाले आहे.
 सांधेदुखी, पोटाचे विकार, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या वृद्धत्व विकारांवर नियमित उपचार, तपासणी, औषधोपचार, मसाज, आदी सोई प्राथमिक आरोग्य केंद्रात असल्या तरी त्यांतील अनियमितता, तुटवडा, मनुष्यबळ अभाव इ.मुळे सुविधा असून लाभ नसतो, अशी स्थिती आहे. पाल्यांची टाळाटाळ, मेहरबानी हीच उपचार संधी अशी ग्रामीण स्थिती आहे. रुग्णवाहिका आहेत; पण त्यासाठी अत्यवस्थ होण्याची पूर्वअट त्यांना शहरी आधुनिक उपचार, सुविधांपासून वंचित ठेवत आहे. शहरी महागडे उपचार ग्रामीण वयोश्रेष्ठांच्या आर्थिक आवाक्याबाहेर गेले आहेत. उपचार खर्चाचे आकडेच त्यांचे डोळे पांढरे करण्यास पुरेसे आहेत. काळजी घेण्यासंदर्भात पती-पत्नी एकमेकांवर अवलंबून असण्याचे प्रमाण ४२ टक्के आहे. आपल्या मुला/ सुनेवर अवलंबून असणारे वयोश्रेष्ठ पालक ३५ टक्के आहेत. ५५ टक्के

सामाजिक विकासवेध/१६८