पान:साथ (Sath).pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०



 एक दिवस सकाळी फिरून परत येतेय तो तिला प्रताप येऊन तिच्यासाठी थांबलेला दिसला. तिला रात्री चांगली झोप लागली नव्हती आणि सकाळी उठायला उशीर झाला होता. तरीही ती फिरायला गेली आणि मग वाटलं त्यापेक्षा लांबवर भटकत गेल्यामुळे परत येईतो जवळजवळ जेवायची वेळ झाली होती.
 मुलांपैकी कुणालाही पाहून तिच्या हृदयात आनंदाची ऊमा उसळायची तशी आताही उसळली, आणि त्याच्यामागोमाग एक वेदनाही जाणवली.
 " प्रताप, तू इथे कसा?"
 " तुला भेटायला आलो. यायला नको होतं का?"
 का कोणास ठाऊक ती त्याला नेहमी नको ते काहीतरी म्हणे. किंवा ती काहीही बोलली तरी त्याच्या कुत्सित हसण्याने, छद्मी बोलण्याने तो त्याचा विपर्यास करी. लहानपणी जरासा बुजरा, लाडिक, मनातलं सगळं विश्वासानं तिच्यापाशी बोलून टाकणारा

१०२ : साथ