पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दीनानाथ फार भाग्यवान. पाचही मुलांच्या कर्तृत्वामुळे त्यानी लावलेला कल्पवृक्ष किती बहरला हे त्याना प्रत्यक्षात पाहायला मिळालं नाही तरी माईंच्या डोळ्यांनी त्यानी नक्कीच बघितले असेल. लतादीदी तर काय गळ्यात गंधार घेऊनच जन्माला आल्या. भारतीय गानकलेच्या नंदनवनातील ही स्वरलता म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीची अनभिषिक्त गानसम्राज्ञी आहे असे आचार्य अत्रे म्हणत. तिला 'मराठा' मधून अभिवादन करताना त्यानी म्हटलंय की “वृत्तपत्राच्या जाड्याभरड्या कागदावर हे अभिवादन करणे, म्हणजे एखाद्या अप्सरेच्या स्वागतासाठी तिच्या मृदू चरणकमलांखाली जाड्या भरड्या गोणपाटाच्या पायघड्या अंथरण्याइतके, अथवा कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यांचे चित्र काळ्या पाटीवर कोळशाच्या कांडीने रेखाटण्याचा प्रयत्न करण्याइतकेच विशोभित आहे, या जाणिवेने आमचे मन आम्हाला खात आहे." ३६ वर्षापूर्वी लताला 'भारतरत्न' ही सर्वोच्च पदवी द्यावी अशी मागणी करणाऱ्या आचार्य अत्र्यांची अिच्छा नुकतीच फलद्रुप झाली. लतादीदीनी सर्व प्रमुख भारतीय भाषांमधून तीस हजारांवर गाणी म्हटली असतील. तरीसुद्धा 'अतिपरिचयात् अवज्ञा' ही परिस्थिती त्यांच्याबाबतीत कधीच निर्माण होणार नाही. गंमत म्हणजे आशाबाई तशाच श्रेष्ठ गायिका आहेत. काही क्षेत्रातून तर त्या लताबाईंच्याही पुढे गेलेल्या आहेत. त्यानी स्वतःचे कर्तृत्व इतके सिद्ध केलेले आहे की, प्रसिद्धीमाध्यमे मुद्दाम लता श्रेष्ठ की आशा श्रेष्ठ असा वादंग निर्माण करतात. त्याबाबतीत एकदा आशाबाईनीच फार मार्मिकपणे सांगितलंय की "कात्रीची दोन्ही पाती वेगवेगळी जरुर होतात पण जेव्हा एकत्र येतात तेव्हा जो त्यांच्यामध्ये सापडेल त्याचाच तुकडा पडतो.” लता, आशाप्रमाणेच अषा मंगेशकरही अत्तम गातात. पाच हजारांहून अधिक अशी त्यांची गाणी आहेत. गायिका असूनही त्याना चित्रकलेचा मोठा छंद आहे. एम. आर. आचरेकर यांच्या सारखा चित्रतपस्वी त्याना गुरु म्हणून लाभला होता. अनेक कला दालनांमधून त्यानी स्वतःच्या चित्रांची प्रदर्शने भरवली आहेत. मीना मंगेशकरही अत्तम गातात. त्यानी पार्श्वगायन केले पण कमी प्रमाणात केले. लहान मुलांच्यासाठी त्यानी वैशिष्ट्यपूर्ण अशी संगीतरचना केली. त्यांचा 'चॉकलेटचा बंगला' हा बालगीतांचा अल्बम प्रचंड गाजला. हृदयनाथ मंगेशकर हाही एक चमत्कार मानावा लागेल. स्वतः अत्तम गायक ते आहेतच. पण त्यांचा खरा परिचय म्हणजे ते एक असामान्य, प्रयोगशील, अलौकिक प्रतिभा लाभलेले संगीतकार आहेत. हाताची पाच बोटे एकसारखी नसतात. तशी ही पाच मंगेशकर भावंडं गुणात्मक दृष्ट्या कमी-जास्ती असतील पण पाची बोटांची मिळून जी मंगेशकरी मूठ बनते ती विलक्षण सामर्थ्याची आहे. या मंगेशकर मंडळींच्या गाण्यांची संख्या अवढी प्रचंड आहे की, केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे या भावंडांनी या चंदेरी दुनियेतून 'आम्हाला सांगली आणि सांगलीकर... ..२२४