पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऋणनिर्देश

 गेली तीन वर्षे मी या पुस्तक लेखनाच्या खटाटोपात आहे. या काळात मी असंख्य लोकांना भेटलो. अनेक वाचनालये धुंडाळली. या सर्वांचा नामोल्लेख करता येणार नाही पण कांहीचा केल्याशिवाय मनाला स्वस्थताही वाटणार नाही. अशा वेळी सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव येते ते प्रि. क. श्री. काळे यांचे. काही पूर्वपरिचय नसताना त्यानी मला लेखनकामात बहुमोल मार्गदर्शन केले. सातत्याने प्रोत्साहन दिले. इतकेच काय पण वेळप्रसंगी पुस्तकाची प्रुफेही तपासून दिली. असेच सदैव माझ्या पाठीशी सातत्याने राहिले ते माझे मित्र प्रा. काशिनाथ वाडेकर. त्यानी आणि श्री. न.वा. सहस्रबुद्धे यानी प्रुफे तपासण्याचे किचकट काम मनापासून केले. माहिती संकलनासाठी डॉ. मधु आपटे, प्रा. सुधाकर रानडे, हिंदुराव पाटील, डॉ. श्रीनिवास नाटेकर, डॉ. सांबारे, प्रा. रोहिणी तुकदेव, श्री. शिवाजीराव पवार, संजय कोटणीस, मधुकर खरे, अशोक तेलंग, पंडित पानवलकर, सदानंद कदम, सिकंदर अमीन या सर्वांची मला मदत झाली. तसेच छायाचित्रे मिळविण्यासाठी सर्वश्री अशोकराव घारपुरे, प्रभाकर वेलणकर, सुरेश पाटील (माजी नगराध्यक्ष) यांची मदत झाली. या सर्वाचा मी ऋणी आहे.

 प्रा. हातकणंगलेकर सरांचे औपचारिकपणे आभार मानणेही चुकीचे ठरेल इतकी आस्था त्यांनी या पुस्तकाच्या कामी दाखविली. अनेक कामांच्या आणि दौऱ्यांच्या गर्दीतून त्यांनी प्रस्तावना लिहिण्यासाठी वेळ दिला हे माझे भाग्यच. सांगली (जिल्हा) नगरवाचनालयाने पुस्तक प्रकाशनाचे काम करुन एक प्रकारे पुस्तकाला प्रतिष्ठाच मिळवून दिली त्याबद्दल कार्यकारी मंडळाचा मी आभारी आहे.

 पुस्तकासाठी चाललेली माझी धडपड पाहून श्री. भास्करराव भिडे (माधवनगर) आणि श्री. प्रभाकरराव गद्रे (प्रसाद व्हरायटी स्टोअर्स) यानी आपणहून प्रत्येकी रु. १०००/ - ची देणगी देऊन शुभारंभ केला. 'श्रीमती राजमती नेमगौंडा पाटील ट्रस्ट'ने मला रु.५०००/-ची घसघशीत देणगी दिली. याशिवाय पुढील व्यक्ती व संस्थानी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांचा मी ऋणी आहे.

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालीका,
सांगली चेंबर ऑफ कॉमर्स
भारती विद्यापीठ
सांगली अर्बन को. ऑप. बॅक लि.
मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ - सराफ पेढी

मे. गोविंदराम शोभाराम आणि कंपनी

चौदा