पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



उभारण्यात पुढाकार घेतला, सांगलीत येणे आणि सांगलीतून जाणे सर्वच प्रवाशांना सुखाचे व्हावे तसेच सांगलीचा व्यापार वाढावा म्हणून सांगली गाव, पुणे-मिरज ब्रॉडगेज लाईनवर यावे म्हणून यशस्वी प्रयत्न केले, सांगलीच्या चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेला पाठबळ देऊन, व्यापाऱ्यांचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला, अनेक क्रीडा प्रकारांना उत्तेजन दिले. अशा अजून कितीतरी गोष्टी सांगता येतील.
 सारांश, सांगलीच्या प्रत्येक लहान - मोठ्या घटकाला वाव मिळावा, सांगलीची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून वसंतदादांनी अथक प्रयत्न केले. सांगलीकर जनता एकमुखाने म्हणूनच कौतुकाने म्हणते,

 

'चिंतामणराये रचिला पाया

 

वसंतराये कळस चढविला. '


 खरंच वसंतदादा म्हणजे सांगलीचे शिल्पकारच !

५६ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील