पान:सयाजीराव - चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे सार्वभौम राजा आहेत.
 छत्रपती शिवरायांच्या बहादूर मावळ्यांनी ७५ टक्के हिंदुस्थानवर शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची पताका शौर्याने फडकावली, परंतु आपसातील भाऊबंदकी अन् शत्रुपक्षास मदत करत इ.स. १८१८ ला मराठेशाही एकशे अडतीस वर्षांत बुडाली. शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न झाकोळले. शिवरायांनी अनेक मराठे सरदारांच्या मदतीने स्वराज्य उभारले. त्यातील बडोद्याचे गायकवाड हे एक होते. इ.स. १७२० ला त्यांनी मराठे शाहीच्या एका सुभ्याची मुहूर्तमेढ रोवली. ती गढी स्वातंत्र्यापर्यंत म्हणजे २२७ वर्षे ताठ मानेने उभी राहिली. या प्रवासातील एक मैलाचा दगड होते स्वच्छ चारित्र्याचे, निर्व्यसनी सौर्वभौम राजा सयाजीराव गायकवाड. हा इतिहासही समजून घेणे आजची गरज आहे.

●●●
सयाजीराव एक चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा / १५