सुरू केला. पूजाविधीचे संस्कृत ग्रंथ मराठी-गुजराथीत छापले. ही गोष्ट सनातन आणि वेदोक्त पद्धतीचा पाठपुरावा करणाऱ्या काही मंडळीस आवडली नाही. त्यांच्यात असंतोष वाढू लागला. कोल्हापूरचे वेदोक्त प्रकरण सुरू होण्यापूर्वी सयाजीरावांनी बडोद्यात हा प्रश्न सामंजस्य आणि मध्यम मार्गांनी कुशलतेने
हाताळला.
या काळात धर्मखात्यात सयाजीरावांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. पुरोहित धर्मशास्त्रानुसार पूजा-विधी करत असतात. हा वर्षानुवर्षे त्याचा व्यवसाय आहे. एखाद्या व्यक्तीस करायचा झाल्यास, त्याला त्याचे ज्ञान हवं., उदाहरणार्थ डॉक्टर, शिक्षक, इंजिनिअर, वकील हे त्या त्या व्यवसायाचे शिक्षण घेतात. परीक्षा पास होऊन व्यवसाय करतात. त्यांना त्या व्यवसायाचं ज्ञान असते. परीक्षा पास झाल्याचे त्यांच्याकडे प्रमाणपत्र असते. पुरोहिताचाही व्यवसाय आहे. या पुरोहितांना धर्मशास्त्र, पूजापाठ आणि मंत्रविधीचं पुरेसे ज्ञान आहे की नाही तपासण्याचा सरकारचा अधिकार आहे. जे पुरोहित ही परीक्षा पास होतील, त्यांनाच प्रमाणपत्र दिले जाईल. त्यानंतरच ते पुरोहित व्यवसाय करण्याचे कायद्याने लायक आहेत. यात आणखी एक अट घातली. पूजा-मंत्रविधीतील संस्कृतमंत्रांचा अर्थ यजमाना त्यांच्या भाषेत सांगण्याची सक्ती केली. या निर्णयाने जुन्या पंडित मंडळींनी थोडा विरोध केला. असमाधानातून कुरबुरही वाढली; पण व्यवसाय न सोडता पुरोहित मंडळी नव्या कायद्यानुसार धर्मकार्य करू लागली.