Jump to content

पान:सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४ : समारोप
 महाराज सयाजीराव आणि राजर्षी शाहू हे दोघेही समाजपुरुष लोककल्याण आणि समाजसुधारणांसाठी उत्तम प्रशासनाचा आदर्श होते. दोघेही उदार होते, बुद्धिवादी होते, नवीन प्रयोग करण्यास मागे-पुढे पाहत नसत. सयाजीरावांचा मदतीचा हात अधिक मोकळा होता. वेगवेगळ्या जातींच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृहाचा शाहूंचा प्रयत्न हे चांगले उदाहरण सांगता येईल. शाहू छत्रपतींचे ब्रिटिश सरकारांशी असलेले मित्रत्वाचे संबंध आणि वागणे त्यांच्या समतोल व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवते. या उलट एक व्यासंगी, विद्वानांच्या संगतीत वावरणारे आणि जगभर फिरलेल्या स्वाभिमानी सयाजीराव महाराज ब्रिटिशांची रणनीती पुरती ओळखून आयुष्यभर संयमाने सरकारशी संघर्ष करत राहिले. हे करत असताना त्यांनी रयतेच्या कल्याणाचा चोवीस तास ध्यास घेतला. साहित्य कला, संस्कृती, उद्योग, शेती आणि प्रशासनात बडोदा हे हिंदुस्थानातील अग्रगण्य संस्थान बनवले.

 शाहू महाराज यांच्यापूर्वी महात्मा फुले व सत्यशोधक चळवळीकडे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी लक्ष दिले. राजर्षी शाहू आणि महाराजा सयाजीरावांची पिंड व प्रकृती मूळतः भिन्न होती. राजर्षी शाहू एखादी गोष्ट करताना एकदम धक मारत, टक्कर घेऊन प्रतिस्पर्ध्याला चारीमुंडी चीत करण्याची पहिलवानी शक्ती वापरत. याउलट सयाजीराव महाराज एखादा निर्णय घेताना चार तज्ज्ञांचे मत घेत, त्यांच्याकडून अहवाल

सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती / ४४