दरवर्षी परदेश प्रवास सुरू झाला. या काळात लॉर्ड कर्झन व्हॉइसरॉय म्हणून आले. हिंदुस्थानातील राजे लोकांचे वारंवार परदेशात जाणे, तिथे हौसमौज करणे व्हॉइसराय यांच्या कानावर आले होते. त्यांनी या संदर्भात एक परिपत्रक काढून सर्व राजांना कळविले. राजांचे वारंवार सफरीवर जाणे कर्तव्यच्युती मानली जाईल, खासगी कामासाठी दौरा नसावा, परदेश सफरीसाठी यापुढे मंजुरी घ्यावी लागेल, अशा कडक सूचना 'कर्झन सर्क्युलर'मध्ये होत्या. एवढेच नाही तर प्रवासात चारित्र्य आणि सवयी यावर लक्ष ठेवले जाईल. अशी गर्भित धमकीही दिली होती.
कर्झन यांच्या परिपत्रकातील आशय आणि निर्बंध सयाजीराव महाराजांना आवडत नाही. ते अस्वस्थ झाले. आपल्या सार्वभौम अधिकारावर आणि स्वातंत्र्यावर व्हॉइसराय बंधने आणत आहेत, ही त्यांची भावना तीक्र झाली. महाराजांनी कर्झन यांना पत्र लिहून कळविले, आम्हाला आमच्या संस्थानचे अधिपती समजण्यात येते खरे; पण एखाद्या पगारी नोकराहून कमी दर्जाची वागणूक दिली जाते. ( Source Material, १९५८, ५७३)
या काळात सयाजीरावांनी अरविंद घोष या क्रांतिकारक विचारांच्या बंगाली तरुणास बडोद्यास नोकरीस ठेवले होते. आय.सी.एस. लेखी परीक्षा पास झालेल्या अरविंदांनी घोडेस्वराची परीक्षा न देता, ब्रिटिश प्रशासनातील मोठी संधी स्वत: होऊन ठोकरली, हे सयाजीरावांच्या कानावर आले. त्यांनी