पान:समता (Samata).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मागणी करणे, मौखिक अथवा अन्य प्रकारचे लैंगिक वर्तन, ही सर्व गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये आहेत.

  • शिक्षेची तरतूद••• | मनाविरुद्ध लैंगिक जवळिकेची मागणी करणे किंवा उघडपणे तसे सूचित करणे यासाठी ५ वर्षांपर्यंत सक्त मजूरी किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. वर नमूद केलेल्यांपैकी अन्य कृत्यांसाठी एक वर्षाची कैद किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा सुनावली जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीविषयी लैंगिक भाव दर्शविणारा केलेला शेराही शिक्षेस पात्र आहे आणि त्यासाठी एक वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
  • तक्रार कोणाकडे कराल?

जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्वरीत अथवा फोनवरुन त्वरीत मदत मागू शकता किंवा १०० नंबरवर किंवा १०९१ नंबरवर संपर्क साधून पोलीसांची मदत घेऊ शकता. ENOUGH is ENCUGH लेक लाडकी अभियान शिरुर (का) (१०)