पान:समता (Samata).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

छेडछाड विरोधी कायदा छेडछाडीविरुध्दचे गुन्हे हाताळण्यासाठी सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या सूचना

  • कायदा काय सांगतो

छेडछाड रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशात सूचना देण्यात येते की सिव्हील ड्रेसमधील महिला पोलीस बसस्टेशन, रेल्वेस्टेशन, मेट्रो स्टेशन्स, सिनेमा, थिएटर, बाजार, शॉपींग मॉल, समुद्र किनारे, मंदिर परिसर या ठिकाणी नेमण्यात यावेत. वरील सर्व ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात यावेत. शैक्षणिक संस्था, मंदिराचे ट्रस्टी, सिनेमा थिएटरचा मालक, रेल्वे स्टेशन, बस स्टेशनचे इनचार्ज यांनी छेडछाड रोखण्यासाठी त्यांच्याकडे तक्रार आल्यावर त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी आणि त्यांच्या परिसरात छेडछाडीस आळा बसविण्यासाठी पुढाकार घेऊन भूमिका घ्यावी. छेडछाडीच्या/विनयभंगाच्या हेतूने महिलेवर हल्ला करणा-यास या कायद्यान्वये दोन वर्षांची कैद किंवा दंड, अथवा दोन्ही, अशा शिक्षेची तरतूद आहे. नुकत्याच यामध्ये काही दुरुस्त्याही करण्यात आल्या आहेत. तसेच या लैंगिक छळाची व्याख्या देण्यात आली आहे. यानुसार जबरदस्तीने अश्लील साहित्य दाखविणे, उघड-उघड लैंगिक उद्देशाने मनाविरुद्ध शारीरिक जवळीक साधणे, लैंगिक संबंधाची लेक लाडकी अभियान शिरुर (का) (९)