पान:सभाशास्त्र.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २२४ ހހހހހތވރކޅގތރކޅގތރކގ ••••••••• तेव्हां बदलता येणार नाहीं; इतकी व्यवस्था घटनेत असली पाहिजे. त्याचबरोबर ध्येय जर प्रभावी राहावयाचे असेल तर, परिस्थितीप्रमाणे त्यांत बदल करण्याची व्यवस्था पण घटनेत असली पाहिजे. मनुष्यजीवन हा प्रवाह आहे, त्यांत चैतन्य आहे, त्याला विकासाला, कर्तृत्वाला वाव मिळाला पाहिजे; आणि जर संघामार्फत ते व्हावयाचे असेल तर, संघ हा सांप्रदाय होता कामा नये, म्हणजे परिस्थितीप्रमाणे संघकायांत बदल झाला पाहिजे. संघ हा जर ध्येय कालानुकूल असेल तरच जिवंत राहातो. वाहणारी नदी आपला वेग व पात्र वाढवीत जाते, तीच गोष्ट संघाबाबत अनुभवाला आली पाहिजे. योग्य परिस्थितीत ध्येयांत व उद्दिष्टांत अनुरूप बदल करण्याचा अधिकार, व तो अंमलात आणण्याची योजना घटनेत असली पाहिजे, ध्येय अगर उद्दिष्टानंतर संस्थेच्या नांवाचा विचार हाही महत्त्वाचा ठरतो. नांवांत काय आहे असे म्हणून भागत नाही. तसेच नांवासाठीच धडपड करणेही योग्य ठरत नाहीं. ध्येय अगर उद्दिष्ट यांचे ज्ञान सहज होईल अगर कार्यक्षेत्राचे निदर्शन सहज होईल, अगर स्वरुपाची कल्पना सहज लक्षात येईल, असे संस्थेचें नांव असावें. कुलपरंपरा जशी बनत जाते, तशीच संस्थेची परंपरा बनत जाते व ती बनण्याचे काम तिचें नांव हा मध्यबिंदु असतो. अभिमान जागृत करणारे ते चैतन्य असते. एकाच नांवाच्या दोन संस्था एकाच ठिकाणी असणे अयोग्य आहे; म्हणून संस्थेचे नांव ठरवितांना ही काळजी घेतली पाहिजे. पुष्कळ वेळां मूळ संस्थेत दुफळी होऊन, फुटलेले लोक तेच अगर तसलेच नांव घेऊन, दुसरी संस्था काढतात. या योगाने दोहोंचे कायोवर अनिष्ट परिणाम होतो. मूळ संस्थेचें नांव कोण घेऊ शकतो हे त्या संस्थेचे घटनेप्रमाणे निर्णायक रीतीने ठरविता येते, ते ठरविल्यानंतर अट्टाहासाने अगर आग्रहाने इतरांनी ते घेणे अयोग्य आहे. कार्यासाठी प्रयत्न न होता मग नांवासाठीच सर्व उत्साह खर्ची पडतो. नांव ठरवितांना होणारे कार्य त्याला शोभेल इतकें राहील असा विचार करणे अप्रस्तुत नाहीं. लहान शहरांत मूठभर प्राकृत लोकांनी जमून अखिल भारतीय संस्था अशी संज्ञा देणे म्हणजे कार्याची थट्टा आहे. संस्थेचे नांव ठरविण्यांतसुद्धा मर्यादेचा, प्रतिष्ठेचा, प्रासंगिकतेचा विचार करणे अवश्य आहे. संघ म्हणजे सभासद- हे अनेक अर्थनीं खरे आहे. संघाची इमारत भव्य, पण आत काम करणारे अल्पमति अगर क्षुद्रबुद्ध; संघाचे नांव व्यापक, क्षेत्र