पान:सभाशास्त्र.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सार्वजनिक सभातंत्र सामाजिक अगर अन्य कोणताही प्रश्न होऊ शकतो. सभेपुढील विषय अगर बाब सार्वजनिक असली पाहिजे. व्यक्तीच्या हिताचा प्रश्न सार्वजनिक सभेचा विषय होऊ शकत नाहीं. व्यक्तीची खाजगी बाब सार्वजनिक प्रश्न होत नाहीं. मात्र व्यक्तीच्या कृत्याने सार्वजनिक नीतिमत्ता अगर हिताला बाधा येत असेल तर ती बाब सार्वजनिक होऊ शकते. अने लग्न केले, अगर दुसरे लग्न केले ही खाजगी बाब आहे. पण 'अ' हा जर सार्वजनिक क्षेत्रांत काम करणारी महत्त्वपूर्ण व्यक्ति असेल, तर, हे त्याचे कृत्य सार्वजनिक महत्वाचे ठरते. 'अ' या सार्वजनिक कार्यकर्त्याला साठ वर्षे पूर्ण झाली, अगर ‘अ’ला मोठा अधिकार मिळाला, अगर त्याने निवडणूक जिंकली तर “अ'चा सत्कार ही सार्वजनिक बाब होऊ शकेल. सार्वजनिक सभेचा विषय होण्यासाठी कांहीं तरी प्रमाणांत सदरहू विषय अगर बाब सार्वजनिक महत्त्वाची असली पाहिजे. । सार्वजनिक सभेचा उद्देशः–प्रचार, पाठिंबा, मतप्रदर्शन, निदर्शन, मनोरंजन, दुःखनिवारण, गुणादर करणे वगैरे उद्देश सार्वजनिक सभेचे असतात, विशिष्ट मताचा प्रचार करण्यासाठी व्याख्याने देणे हा एक प्रचारांतील मोठा भाग आहे. आपले मत मांडण्यास मोकळीक असणे म्हणजे भाषणस्वातंत्र्य व या स्वातंत्र्याच्या उपभोगाचे क्षेत्र म्हणजे सभा. सभा में प्रचाराचे मोठे प्रभावी साधन आहे. निवडणुकीचे दौरे म्हणजे ठिकठिकाणी झालेल्या सार्वजनिक सभा याच मुख्यत्वें होत. आपल्या विचारसरणीला, आपल्या पक्षाला, आपल्या उमेदवारांना पाठिंबा मिळविणे हाही एक सभेचा प्रमुख उद्देश असतो. खरें पंचांग कोणते हे लोकमताने ठरविण्यापासून ते देशाचे खरे कैवारी कोण, खरें मत काय हे ठरविण्यापर्यंत सभेचा उपयोग केला जातो. एखादा कायदा अगर बिल किंवा एखादं सरकारी कृत्य जनतेला पसंत नसेल अगर असेल हे मतप्रदर्शन करून ठरावण्याचे सर्वश्रेष्ठ साधन सभा में आहे. लोकमताचा प्रभाव दाखवण्यासाठी, जनतेचे विराट् स्वरूप दाखविण्यासाठी मिरवणुकी व सभा ही सर्वमान्य निदर्शने आहेत. ज्ञानदानाचे सभा में व्यापक माध्यम आहे. जनतेची दुःखें व तक्रारी राज्यसत्तेचे कानांवर जाण्याचा मार्ग ! | म्हणून सभेचे महत्त्व आधुनिक जगांत सर्वांना पटलेले आहे. बौद्धिक मनोरंजन करणे हाही सभेचा उद्देश असू शकतो. निरनिराळ्या दृष्टिकोनांतून होणारी चर्चा ऐकून, श्रेष्ठतर आनंदाचा लाभ होऊ शकतो.