पान:सफर मंगळावरची.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लहान एक छोटं बाळ होतं त्यांना. हेलन छोटं बाळ असताना अगदी निरोगी, गोंडस, सुंदर होती. ती हसली की गालाला नाजूक गोड खळी पडायची. डोळे तर अतिशय बोलके, सुंदर होते. नजरच लागली की काय कुणास ठाऊक त्या डोळ्यांना ?
 हेलन फारच हुशार होती. सहा महिन्यांची असताना पाणी हवं असलं की, पा... पा ... असं म्हणायची. मा... मा... म्हणायची. एवढी तिची समजूत होती. फारच बुद्धीमान होती. एकदा काय झालं कळलंच नाही, हेलन खूप आजारी पडली. चमत्कारिक दुखणं होतं. डॉक्टरांनाही खात्री वाटेना ती जगण्यावाचण्याची. तिचे आईवडील रात्रंदिवस तिच्या उशापायथ्याशी बसून होते. आईची तर फारच लाडकी. तिनं कितीतरी वेळा देवाला प्रार्थना केली असेल, नवस बोलली असेल, माझी हेलन दुखण्यातून उठू दे, चांगली बरी होऊ दे. एकेदिवशी डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश आलं. हेलनची प्रकृती सुधारू लागली. हेलनचे वडील वृत्तपत्र संपादनाचा व्यवसाय करीत. डॉक्टर त्यांना म्हणाले,

सफर मंगळावरची । ८५