पान:सफर मंगळावरची.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आम्हाला चांगल्याशा हॉटेलमध्ये नेलं. पावभाजी खाऊ घातली. खाता खाता त्या दोघांनी गप्पा मारल्या. त्याचं ते वागणं बघितल्यावर, मी ठरवलं आता आपण उगाच कुणावर दादागिरी करायची नाही. आपली शक्ती चांगल्या कामासाठी खर्च करायची. दादागिरीसाठी नाही. आपण सगळे घोळ्यामेळ्याने राहायचे.” राजू हे कुलदीपला सांगत असताना सगळेच तिथं आलेले. सगळे शांतपणे ऐकत होते. राजूचं बोलून झाल्यावर सगळ्यांनी एकसुरात, 'हुर्ये ऽ हिप हिप, हुर्ये ऽ' केले.

***
सफर मंगळावरची । ६३