पान:सफर मंगळावरची.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हरवला की लगेच दुसरा नवा दगडी चेंडू आणून देत. राजूला चेंडूचं अतिशय वेड. चालायला लागल्यापासून चेंडूशी खेळायचा. झोपतानाही उशालाच चेंडू ठेवायचा. अभ्यासातही हुशार. एकदा घटक चाचणीच्या वेळी, सातवीत असताना, त्याला गणितात पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. त्यावेळी त्याच्या बाबांनी त्याला क्रिकेटचे संपूर्ण किट आणून दिले होते. आणि सांगितले होते, "आपल्या सोसायटीतल्या सगळ्या मुलांना बरोबर घेऊनच खेळायचं. क्रिकेटमुळं किंवा कुठल्याही एकत्र खेळामुळं सांघिक भावना वाढते. तुमचा एक संघ तयार व्हायला हवा." वगैरे वगैरे.
 असं बरंच सांगितल्यामुळं राजू सगळ्यांना बोलवायचा. मैदानावर मात्र त्याचीच दादागिरी चाले. तो मोठा म्हणून आणि त्याचं संपूर्ण कीट म्हणूनही मुलांना त्यांचं नाईलाजाने ऐकावेच लागे.
 "बगळ्या, चिंटू, श्री, कुलदीप, अनिल चला सगळे. "
 राजूची आरोळी ऐकू आली. मुलं स्पोर्टशूज घालून मैदानावर निघाली. राजू बगळ्याला म्हणाला,
 "बगळ्या, आज तू बॅटिंग करायचं, पहिल्यांदा.
 बगळ्यासहित सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. बगळ्या गडबडून गेला. पहिल्या षटकातच कुलदीपने त्याची दांडी उडविली. नंतर श्रीला बॅटिंग दिली.


सफर मंगळावरची । ६१