पान:सफर मंगळावरची.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सफर मंगळावरची मानसी आणि सौरभ आज विशेष गंभीर दिसत होते. शेजारी राहणारे हे दोस्त, पण मैत्रिपेक्षा भांडणेच जास्त. दोघांच्या आयांची मैत्री मात्र छान. जिव्हाळ्याची होती. आज दोन्ही पोरांचे आईवडील हवं नको ते बघत होते. अंतराळ प्रवासाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली. काऊंट डाऊन सुरू झाले. उड्डाणाचा एकेक क्षण जवळ येऊ लागला. राकेश शर्मा हा पहिला भारतीय अंतराळवीर. त्यानंतर सौरभ व मानसी अंतराळ प्रवासाला निघालेले. साहजिकच दोघांच्या घरचे काळजीत. पण आपल्याच मुलांची निवड झाली म्हणून त्यांना अभिमानही वाटत होता. सौरभची आई गरमगरम थालीपीठ करून वाढत होती. तर मानसीच्या आईनं पुरणपोळी करून आणलेली. रोज चंगळ होती. कडबू, पुलाव, बिर्याणी, छोले-भटुरे, पावभाजी, चाट, कचोरी, सामोसे, असे चटपटीत पदार्थ होतेच. अनारसे, चकली, चिवडा, बेसनलाडू, ह्या पदार्थांची तर दिवाळी होती. "आई आता लवकर दही- पाटं खायला मिळणार नाही. ' सौरभ म्हणाला. 33 "भरपूर खाऊन घे मग. आठ महिने जिभेवर चव राहायला हवी. ' मानसी सौरभला खिजवत म्हणाली. "तुला पुरणपोळी आवडते ना, आपण बरोबर घेऊ म्हणजे दिल्लीपर्यंत तरी पुरेल. " सौरभ म्हणाला. " वा रे ऽऽ वा ऽ सारखं सारखं खाऊन पोट बिघडलं म्हणजे माझं जाणचं रद्द होईल त्याचं काय ?" "तू नाही आलीस तर रोहित येईल. बरं