पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सदर्मदीप. अंक ३ आत्मानुभव सर्व वेदांताचें श्रवण । तथापि नकळे आपण कोण || अधीक वाढले मोपण | आत्मानुभव न घडतां ॥ ( निगमसार ) कोणत्याहि गोष्टीचा अनुभव घडल्यावांचून त्या विषयाची सत्यास- स्पता व सुख दुःख या विषयीं खात्री होत नाहीं. अनुभव हैं सर्यात बरिष्ट्र प्रमाण आहे. एखादा मनुष्य कांही विषयाचे प्रतिपादन करीत असला किंवा कांहीं हरकित सांगत असला झणजे त्या प्रसंगी " या विषयी मी स्वतः अनुभव घेतला आहे, किंया ही गोष्ट मी समक्ष पाहिली आहे" असें जेव्हां तो ह्मणतो तेव्हां त्याविषयीं स्वाची व त्याचे अनुया यी मंडलोचोहि खात्री होते. साधारण व्यवहारिक गोष्टींविषय आपली खात्रो होण्यासदि जर त्याचा अनुभव घडाग लागतो, तर मग ईश्वर विषयक गहन विचारांचा अनुभव घडणें अवश्यक आहे बरें? नुसती घटपटाची खटपट केल्याने किंवा 'रज्जुसर्पपद्भास:' अशी कोरडी उदाहरणें दिल्यानें अज्ञानी प्रापंची मनुष्यास परमेश्वराचे ज्ञान होणे दुर्लभ होय. त्याला आत्मज्ञान होऊन त्याचा अनुभव घडला पाहिजे, असे समजा, की एक मुलगी आपली आई प्रति दिवसी रात्री आपल्या पिश्याकडे त्या मुलीस एकटी निजले टाकून जाते. काही वेळाने मुल गी जागी होऊन पहाते तों जयल आई नाहीं. पुढे तिला हांका मार ण्याची सुरवात करते व आई आल्या नंतर तिला 'तूं कोठें गेली होतीस से सांग' झणून हा धरून बसते. आतां त्या अज्ञानी मुलीची तिच्या आईनें काय बरें समजूत करावी? एकदा, दोनदा, व. पांचच्यार वेळ य