Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

fot ब्रह्मद्वेप 66 ब्राह्मणांचे श्रेष्ठत्याबद्दल कित्येक लोकांचे असे झणणे असतें कीं, पूर्वीचे ऋषी वगैरे विद्वान, तपोनिधी, परम दयाळू, ज्ञानसंपन्न, विरागी, व परोप कारी असून त्यांचे आंगी “शापादपि शरादपि, असा पराक्रम असे, यमुळे ते पूज्य मानले जात असत. परंतु प्रस्तुतचे ब्राह्मण हे ज्ञानहीन कर्मभ्रष्ट व तेजहीन झाल्यामुळे त्यांस तसा मान देणे योग्य नाहीं. हल्लीं च्या ब्राह्मणांपेक्षा परभु, शेणवी, याणी, वगैरे लोक जास्त विद्वान असून युरोपियन लोक तर शेकडोपट त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञानी आहेत, तेव्हां आता त्यांस पूर्वीप्रमाणे काय झणून श्रेष्टत्व द्यायें ? असे उद्गार बहुधा सर्वत्र ऐकं येतात, आणि ब्राह्मणांचा उपमर्द होण्यास व ते दिवसें दिवस आश्रय रहित आणि दोन होण्यास हेच कारण आहे अशी लोकांची सम जूत झाली आहे. लोकांना असे वाटण्याचे कारण येवढेंच की, हिंदुस्थान देशांत ब्राह्मणकुलामध्ये उत्पन्न झालेले लोक तेवढे मात्र ब्राह्मण, आणि वर् कांचे पृथ्वीवरील सर्व लोक नीच झणजे ब्राह्मण नव्हत अशी साधारण समजूत आहे. पण हीच मोठी चूक आहे. या निबंधाचे आरंभींच गेल्या अंकांत आह्मो शुक्राचार्यांचे हे पुढील मत दिले आहे-- न जात्या ब्राह्मणश्चात्र क्षत्रियो वैश्यरेवन ॥ न शूद्रो नच वै म्लेंच्छो भेदिता गुणकर्मभिः ॥ "त्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे कोणीहि जातीने होत नाहीत, झणजे ब्राह्मणाची संतती ते सर्व ब्राह्मण, क्षत्रिया पासून झालेले ते क्षत्रिय, वैश्या पासून उपजलेले ते वैश्य आणि शहा पासून झालेले ते शूद्र, असा प्रकार नसून सर्व मनुष्यांमध्ये गुणकर्मावरून मेद झाले आहेत" आणि वास्त त्रिक रीतीने पाहिले असतां हाच न्याय खरा आहे. अशा मार्गानें निव डलेले ब्राह्मणांचा अपमान करणे व त्यांचे तेज नष्ट करण्याचा यत्न करणे हें सूर्याचे पिलं गवताचे गंजीत लिकवून ठेवण्या सारखे आहे. वरील