Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मन लावायें व ईश्वरप्राप्तीची इच्छा धरावी झणजे झालें. असा हा मुक्ती चा सिधा रस्ता असतां उगाच जपतपादि खटपटीत पडून देहाला श्रम काय झणून घ्यावे? तशांतून हा देहतर मृत्यूच्याच तोंडांत पडणार, सुगती किंवा दुर्गती यांचा भोगणारा झडला ह्मणजे जीव, आणि तो तर इच्छे नुरूप मुक्त होणारा, तेव्हां त्या करितां व्यर्थ देहाचे मोग त्यास का न भोगुं द्यावे? मृत्यु आला असतां देहाची रांगोळीच होणार, मग त्यांत स मर्थ्य आहे तो पावेतों विषय सुखाचा तरी यथेच्छ अनुभव घ्यावा, हे लो- क बहुधा - भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥ तस्मात् सर्व प्रयत्नेन ऋणं कृत्वा घृतं पिव ॥ अशा प्रकारच्या मतांचे असतात, पण त्यांचें हें मत फार चुकी न दुनया जर अशाच झोंकावर जाईल तर थोडक्याच मुदतीत ब्रह्मदेवा ला रिकामा बसण्याचा प्रसंग येईल. “अंते मतिः सा गतिः " हें वचन खरें आहे. पण अंतकाळीं तशी अनुकूल इच्छा होग्याला काही तरी सा धन पाहिजे. मनुष्याचें मन सर्वदा या संसारांत व्यग्र असतें, आजचें काम शिलक राहिल्यास ते उद्यां करीन असा भरवसा असतांदि मनुष्यास ईश्व राकडे घटकाभर देखील वेळ खर्च करण्याची इच्छा होत नाहीं, मग जेव्हां हें सारें जग सोडून जावयाचा प्रसंग येणार व हरयेक प्रियकर व- स्तंचा वियोग होण्याचा समय येणार, तेव्हा त्यावेळी या संसार संबंधीं गोष्टींत मनुष्याचें मन किती गुंतून जाईल बरें? ईश्वराकडे त्याचें चित्त एकाग्रतेनें लागणें हें तर राहूंद्या, पण त्यास त्याचे नुसतें स्मरण देखील हाणें दुर्लभ होय. याकरितां नेहमी त्याचा अभ्यास ठेविला पाहिजे. नित्यशः ईश्वर भजना मध्ये कांहीं काल तरी अवश्य गेला पाहिजे, नित्यशः ज्ञा नप्राप्तीकडे लक्ष देऊन त्या ज्ञानसंपादनानें विषयादि भोगांपासून मनाचें आकर्षण केले पाहिजे मृत्युचा कांहीं नियम नाहीं. तो क्षणांत जीवाला घे 69