पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० होतो. परंतु अज्ञानानें मायेमध्ये गुंतून मी बाल, मी तरुण, व मी वृद्ध अशा या दैहिक आत्रस्था आपणावर कल्पून स्वत: अविनाशी असतांहि जन्ममरणाचे क्लेश मलाच होतात असे मानतो. या आवस्था नर जीवा च्या असंख्या तर त्या सर्व काळ कायम राहत्या, पण तसे घडत नाहीं. देह जसा जसा जीर्ण होत जातो तसतशी विषायादि भोगांची इच्छा व अभिमान हे नष्ट होतात. पण जीवाचे व्यापार यतकिंतहि कमी न होतां व्यज्ञानी पुरुषाचे तर ते फारच वृद्धींगत होतात. देहाच्या क्रिया राहात आल्या झणजे अज्ञानी जीव । मृत्युला भिऊं लागतो— निवृत्ता भोगेच्छा बहुपुरुषमानो विगलितो । समाना स्वर्याताः सपदि सुल्दो जीवितसमाः || शनैर्यष्टयुत्थानं घनतिमिररुद्धे च नयने । अहो दुष्ट: कायस्तदपि मरणापायचकितः ॥ " विषयादि भोगांची निरीच्छा झाली, पौरुषत्याचा मोठा अभिमान होता तो गळून गेला, समवयस्क होते ते सर्व स्वर्गास निघून गेले, प्राणप्रिय जे मित्र तेहि नाहीसे झाले, काठीच्या आधारानेंहि उमें राह ण्याची पंचाईत पडू लागलो, व डोक्रपां पुढें भयंकर अंधारी येऊं लागली, अशी या देहाची स्थिती झाली तथापि मरणाचा घात मानून जीवाला मोठी भांति वाटते" हें जीवाचें केवढे अज्ञान ? जुने मोडकळीस आलेले घर, आतां पडेल किंया घटकेत तरी कोसळेल अशा स्थितीत आले असूनहि तें सोडून जाण्या विषयीं जर एखाद्यास वाईट वाटले, तर त्यास कोणी मूर्ख झणणार नाही काय? आतां मनुष्याचा जर घरांतच राहण्याचा हेतु असेल तर त्यानें त्या जीर्ण घराचा त्याग करून नवीन सुखा असे घर कोठें मिळेल याच्या तयारीस लगले पाहिजे. तसेंच जीवाने जीर्ण झाले ल्या देहाचे मोहांत न पडून आपल्या पुढील सोयीचे मार्गास लागावें. तो मार्ग झणजे पारमार्थिक विचार होय. आणि तो देह सतेज अ- सतांच करावयास पाहिजे, नाहीं तर एक घर मोडल्या नंतर दुस -