Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४१ पासून जसे अंकुरा दे कार्य होत नाहीं, तद्वत जो ज्ञानी आहे त्याच्या अंतःकरणांत जरी प्रारब्वानुसार विषय भोगेच्छा उत्पन्न झालो तयापि त्या इच्छेचा परिणाम में व्यसन त्या व्यसनाप्रत तो ज्ञानी पावत नाहीं. ज्ञाता पुरुष विषयांचा सत्यत्यानें अंगीकार करीत नसल्यामुळे केवळ भोक्तव्य संबंधानेच त्यांचा अंगीकार करतो. या योगानें त्याच्या प्रारब्ध कर्माचा क्षय होऊन विषयजन्य दुःख त्यास होत नाहीं. प्रारब्धानुसार विषयादिकांचा उपभोग घेणे आणि विषयोपभोगांविषयीं संकल्प करणें हेंच कायतें ज्ञानी आणि अज्ञानी या परस्परां मध्ये अंतर होय. विषयोपभोगांची इच्छापतो सह आणि शाश्वती या संकल्प आणि यज्ञ त्यास भ्रम असे झणतात, हा भ्रमव्यात उत्पन्न करितो. ज्ञानी पुरुष या भ्रमांत पडत नसल्यामुळे तो त्या पासून होणारे दुःखाचाहि अधिकारों होत नाहीं, आणि अज्ञानी पुरुष अशक्य व अप्रयांच्या संकल्प नें भ्रमांत पडून दुपावतो. तेव्हां ज्ञानी व अज्ञाती यांच्यामध्ये असा भेद आहे. दांघोह विषयोपभोगाचे अधिकारी सारखेच असन ज्ञात्याला दुःख न होण्याचे कारण केवळ भोगपरिज्ञान दोप हैं प्रकृत विवे चनावरून वाचकांचे लक्षांत येईलच, या भोगपरिज्ञानाला सदसद्विचार शक्ति पाहिजे. सदसद्विचाराचे योगानें मनुष्यास बरें पाईट कळतें. या सदसद्विचारा विषयींहि चार शब्द लिहून याचकांस सादर करण्याचे मनांत आहे. परंतु आज स्थलसंकोचास्तव सवड नसल्यामुळे प्रकृत विवेचन येथे पुरे करतों. -