पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खाली आझो एक अख्यायिका दिलेली वाचकांस स्मरत असेलच. त्या तरुण स्त्रीपुरुत्रांस जें वरील प्रसंगी दुःख उत्पन्न झाले त्याचे कारण प रस्परांतील अज्ञान होय. तेव्हां भोग्य वस्तू विषयीं भोक्ता माहितगार असला तरच त्या उपभोगापासून त्यास सुवप्रास होतें. तेव्हां यात्र रून वस्तुमात्रा विषयीं ज्ञान असले पाहिजे हे उघड आहे. जगांतील वस्तुमात्र जर सुवकरच असत्या तर मग मनुष्यास त्या विषयों इतकी खबरदारी घेण्याचे कारण नवते, तसेंच यावज्जीव तेवढे सगळेच जर सज्जन असते तर त्यां विषयींहि मनुष्यानें सारासार विचारानें वागण्याचे कारण नपते परंतु जगांतील कित्येक पदार्थ आहेत की ते मनुष्याचे प्राण यांचवितात, व कांहीं त्याच्या प्राणाचें हरण करितात, तसेंच कांडीं पश्चादिक मनुष्याचे संरक्षणाचे उपयोगी पडतात व काही त्यास फाडून खाण्यास तत्पर असतात, हाच प्रकार मनुष्यांतहि आहे, कांहीं व्यक्तीचे योगानें मनुष्य संकटांतून पार पडतो, व कांहीचे संगतीनें तो संकटांत पडतो. तेव्हां असें हैं जग नानाविव पडलें. बरें " यस्तुमात्राचा व्याग करावा असें कदाचित कोणी ह्मणेल तर तसें करण्यास मनुष्य असमर्थ आहे. असमर्थ आहे. कारण, मारव्य कमानें त्या या जगांत आले पाहिजे व त्यांतील भोग भोगलेच पाहिजेत, असे जरी अहे तथापि मनुष्य ज्ञानाचे योगानें वस्तुमात्राशीं संगती ठेऊनाई त्यांज पासून आपले हित होईल तपढेंच करून घेतो. सर्व लोक कांहीं सज्जन नसतात, जे सज्जन असतात त्यांचा स्वभाव चंदना सारख असतो. एका कषीनें टलें आहे - - सुजनो न याति बैरं परतिकार्येविनाशकालेप || छेदपि चंदनतरुः सुरभपति मुखं कुठारस्य || 66 " जे सुजन आहेत ते विपती ग्रस्त झाले असताहि परहित कार्या विषयीं वैर बाळगीत नाहीत. त्यांची वृत्ती चंदन वृक्षा प्रमाणे असते.