पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२५ सुभाषित, त्रिलोकेश: शार्डी शवरशरलक्ष्म द्विधाता लोकानामलभत शिरःकुंतनविधि || प्रयातौ तौ राहोर्दिनकर शशांकौ कवलतां । प्रभुर्नग्नः शंभुः शिरसि लिखितं लयति कः ॥ ५४ ॥ -- 1 " त्रैलोक्याचा स्वामी जो विष्णु त्याला यःकश्चित मिलानें आपल्या बाणानें विद्ध केला. संपूर्ण लोकांचा उत्पन्न कर्ता जो ब्रह्मदेव त्यास शिर च्छेदाचें प्रायश्चित भोगावे लागलें, चंद्र आणि सूर्य यांना राहू मुखामध्ये पडण्याचा प्रसंग येतो, आणि प्रत्यक्ष शंकर जगाचे प्रभु असतां त्यांस दिगंबर वृत्तीनें राहवें लागते, तस्मात् ब्रह्म लिखित कोणाच्यानेंहि टळत नाही". एष वंध्यासुतो याति खपुष्प ऋतशेखरः || मृगतृष्णांभसि स्नातः शशशृंगधनुर्धरः ॥ ५५ ॥ मृगजळामध्ये स्नान केलेला, आकाशाचे पुष्पांची भूषणें ज्या मस्तकावर धारण केली आहेत, आणि सशाचे शिंगाचे वनुष्य धारण करणारा असा हा बंध्यापुत्र चालला आहे" ही अघटितघटना होय. झणजे यांतील प्रत्येक गोष्ट असंभवनीय व अघटित आहे. वरं वनं वरं मैक्ष्यं परं भारोपजीवनं ॥ पुंसां विवेकहीनानां सेवया न धनार्जनं ॥२६॥ " विवेकशन्य पुरुषांची सेवा करून संपत्ती मिळविण्या पेक्षां एखा दे आरण्यांत राहणे, भिक्षा वृत्तीनें निर्वाह करणे, किंवा मोलमजुरी करू न चरितार्थ चालवणेही बरें."