सद्धर्मदीप अंक ४ दांभिक भक्ति. टिळे रोपी उंच दायीं ॥ जनीं मी एक गोसावी ॥ अच्छा पर रंग सारा || पोटी विषयांचा थारा || मुद्रा लावतो कोरुनी ॥ मान व्हावयासी जनीं ॥ तुका ह्मणे ऐसेती || नरका गेले पुढे जाती ॥ जगातील अनेक दृश्यादृश्य वस्तूंवरून ईश्वराची अमानुष व आद्भुत शक्ति जाणणे आणि स्पा जाणीव पणाने सर्व सत्तात्मक व जगदेक प्रभूचें मनोभावें करून चिंतन करणें हचि खरोखर ईश्वरभक्ति हाये. पण लोकांमध्ये अभिमान व मत्सर वाढून ज्याप्रमाणे अनेक गोष्टीत मत भेद होतात, त्याच प्रमाणे या ईश्वर भक्तींतही झाले आहेत. हे अभि मान मतभेद ईश्वरप्राती विषयीं अनुकूल होण्याची तर आशा नाहीच, पण त्या योगानें अनेक लोक अधोगतीस गेले व जात आहेत. ईश्वरमकी ही मनोगामी आहे, आणि मन ज्ञानावीन पडले, तेव्हां त्यास मर्यादित मार्ग उपयोगी नाहीं. ईश्वराचे साक्षात्कारा विषयीं मनु प्याचे अंतःकरण जसे जसें जागृत होईल तदनुरूप तो त्याची भक्ति करतो. या करितां या भक्तीविषयी एकच मार्ग करून ठेवता येणार नाही. मनुष्य आपापले ज्ञानाचे योग्यतेनुरूप नऊ मार्गांनी ईश्वर पदास पायतो. पण कांही अभिमानी लोक त्यांतील अमुक एक मार्ग खरा आणि बाकीचे सगळे खोटे असा आग्रह धरून आपण फसतात व त्यायोगानें अनेक भोळया बापडच्चांस कशी पाडून त्यांस सन्मार्गापासून भ्रष्ट कारतात.
पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१०९
Appearance