पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. एकदां शिवाजी सातारच्या किल्ल्यावर असतांना रामदासस्वामी माहु- लीहून सातारच्या माचीस भिक्षा मागावयास आले होते. शिवाजी किल्ल्यावरून खालीं राजवाड्यांत येतात तोंच रामदासस्वामही राज- वाड्यांत येऊन भिक्षा मागूं लागले. हे ऐकून शिवाजीनें स्वामींस नमस्कार करून बाळाजी आवजी चिटणीस यांचें हस्तें चिठ्ठी लिहून तिचेवर आपले हातची धाकटी मुद्रा करून ती चिड्डी स्वामींच्या झोळींत टाकली. वाचून पहातां राज्याची भिक्षा शिवाजीनें स्वामींस अर्पण केली आहे असे कळलें. तेव्हां स्वामींनी शिवाजीस 'पुढे काय करणार असा प्रश्न विचारला व त्यानें स्वामीसेवा करणार असें उत्तर दिलें. तेव्हां रामदास स्वामींनी आपली झोळी शिवाजीच्या खांद्यावर टाकली व पुढे आपण व मागें शिवाजी असे भिक्षेस निघाले व दोन प्रहरपर्यंत घरोघर भिक्षा मागून वेण्येचे कांठीं जाऊन तेथे शिष्यांकडून पानगे करवून ते सर्वत्रांनी खाल्ले. व मग स्वामी- नीं शिवाजीस आज्ञा केली की, 'जरी तूं मला राज्य अर्पण केले आहेस तरी माझे राज्य तूं चालव' असें म्हणून स्वामी सकाळी झोळींत घातलेली राज्यदानाची चिठ्ठी परत करूं लागले. परंतु शिवाजी ती चिठ्ठी परत घेईना. तेव्हां रामदासांनी ती चिट्टी दिवाकर गोसावी याजपाशीं दिली व शिवा जीच्या विनंतिवरून आपल्या पादुका शिवाजीस दिल्या व मग शिवाजीनें राज्य चालविण्याचे कबूल करून त्याप्रमाणें तो वागूं लागला. 7 येथपर्यंत शिवाजी व रामदास यांच्या भेटीच्या प्रसंगांपैकीं मुख्य प्रसं- गांचे वर्णन केलें. आणखी एकच दंतकथा सांगून हा बखरींतील दंतकथा भाग आटपूं. ही दंतकथा बखरकारांच्या हेतूंपैकी दोन हेतु – रामदासांचें सर्वतोपरी श्रेष्ठत्व व त्यांचा हनुमानावतारीपणा - सिद्ध करण्याकरितां लिहिलेली आहे. शिवाय ज्याला इंग्रजी तर्कशास्त्रांत 'दंडुकेशाईचें प्रमाण ' म्हणतात त्याचेंहि ही दंतकथा एक मजेदार उदाहरण आहे असे दिसून येईल. 1 मराठीतील प्रसिद्ध कवि वामन पंडित यानें काशीस बारा वर्षे अध्ययन करून उत्तम शास्त्रज्ञान संपादन केलें; व गुरूचाहि शास्त्रज्ञानांत पराभव केला. नंतर तो आपल्या स्त्रीसह आपल्या गांवीं येण्यास निघाला. वाटेत