पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. ८१ म्हणजे नारायणाचें वय सात वर्षांचें असतांना सूर्याजीपंत वारले. यामुळे नारायणाचें लग्न लांबले असावें. नंतर थोडे दिवसांनीं नारायणाच्या आईनें त्याच्या लग्नाचा विचार ठरविला. पण नारायणाला तो पसंत नव्हता. तो रुसून एका झाडावर गेला व तेथून त्यानें ओढ्यांत उडी टाकली; त्यामुळे खालच्या खडकाला लागून नारायणाच्या कपाळावर टेंगूळ आले; तें मग मरेपर्यंत तसेंच राहिले; त्यालाच आवाळू ह्मणत. इतकें झालें तरी आईनें लग्नाचा आग्रह सोडला नाहीं व नारायणानें आईला सावधान होईपर्यंत उभे राहण्याचें संदिग्ध वचन दिलें. त्या- प्रमाणे आईने मुलगी पाहून लग्नाची तयारी केली व नवरानवरी बहुल्यावर उभी राहून भटजीनीं मोठमोठ्यानें मंगळाष्टकें हाणून त्याचें शेवटी 'शुभ मंगल सावधान' हे शब्द उच्चारले. हे शब्द ऐकल्याबरोबर नारायण लग्न- मंडपांतून पळून गेला. येथपासून नारायणाच्या आयुष्यक्रमाला निराळी दिशा लागली. ही गोष्ट नारायण बारा वर्षांचा असतांना म्हणजे सन १६२० मध्ये घडली. नारायण घर सोडून निघाला तो गोदावरीचें उगमस्थान व रामाच्या वनवासांतील निवासस्थान जे नाशिक-पंचवटी तेथे आला व नाशकाजवळ असलेल्या टाकळी गांवच्या गुहेत राहू लागला. तो ब्रह्मचारीच होता. तेव्हां त्या आश्रमाला अनुरूप अशी भिक्षावृत्ति ठेवून तो तपश्चर्या व पुरश्चरण करूं लागला. रामदासांच्या (आतां यापुढे त्यांचा रामदास या नावानें निर्देश करणे योग्य आहे ) आध्यात्मिक ज्ञानाचा; त्यांच्या काव्य शक्तीचा व एकंदर भावी साधूपणाचा पाया येथें घातला गेला असला पाहिजे. पण या संबंधाची माहिती बखरींत मुळींच नाहीं. उलट एका सतीचा मृत पति जीवंत केल्याचा दैवी चमत्कार मात्र सविस्तर सांगितला आहे. पण येथें रामदासांनी बारा वर्षे वास करून अध्यात्म ज्ञान मिळविलें असें दिसतें. नंतर तें तीर्थाटनास निघाले व या तीर्थाटनांतही त्यांनी बारा वर्षे .घालविलीं. या प्रवासांत त्यांना खरोखरीच पुष्कळ व्यावहारिक ज्ञान व अनुभव मिळाला असला पाहिजे; त्याचप्रमाणें निरनिराळ्या ठिकाणचें साधूसंत भेटून त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानांत भर पडली असली पाहिजे.. स...६