पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. • येतात अशी सामान्य जनांत समजूत असल्यामुळे रामदासांना साधुत्व व अवतारीपणा मिळाल्यावर असल्या दैवीचमत्कारांच्या गोष्टी त्यांच्या आयु- व्यक्रमासंबंधीं श्रद्धेनें प्रचालित झाल्या किंवा शिष्यांनी गुरूची महती व थोरवी वाढविण्याकरितां मुद्दाम प्रसृत केल्या. हीच रामदासांच्या बखरीं तींत भाकडकथांची उपपत्ति आहे असें या लेखकास वाटतें. कारण असल्या दंतकथा व भाकडकथा महाराष्ट्रांतील दुसन्याहि साधूंच्या बाब तील प्रचलित आहेत. मात्र त्या रामदासांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर नाहींत इतकेंच ! तेव्हां अगदींच अशक्य व असंमजस असा बखरींतील कथाभाग सोडून भूतार्थ व संभाव्य भासणाऱ्या व दासपंथी सांप्रदायांत परंपरागत आलेल्या कथाभागासकट रामदासांचें चरित्र प्रथमतः संक्षेपतः देतों. मग या परं- परागत चरित्रांतील कथांचें ऐतिहासिक पुराव्यानें कितपत समर्थन होतें ते पाहूं. रा मदासांचे वडील सूर्याजीपंत ठोसर हे एक प्रतिष्ठित संभावीत व सुखवस्तू गृहस्थ होते. त्यांना बारा गांवच्या कुळकर्णीपणाचें वतन होतें. ते औरंगाबाद जिल्ह्यांतील आंब्रेड पेट्यांतील जांब या गांवीं रहात असत. हें गांव गोदावरीच्या उत्तर तीराला आहे. सूर्याजीपंताच्या बायको- चें नांव राणूबाई असें होतें. या दांपत्याला बन्याच काळपर्यंत संतान नव्हतें. पण नवससायास करून त्यांना उतारवयांत गंगाधर व नारायण (हेंच राम- .दासाचें मूळचें नांव) नांवाचे दोन पुत्र झाले. गंगाधराचा जन्म सन १६०५ मध्ये झाला; व नारायणाचा जन्म सन १६०८ मध्ये झाला. दोन्ही मुलांची मुंज त्यांच्या पांचव्या वर्षी झाली. गंगाधराचें लग्न वयाच्या सातव्या वर्षी झाले व तो जांब गांवींच आपला संसार करून राहिला. तो रामभक्त होता व पुढे त्याचें श्रेष्ठ असें नांव पडलें. सन १६१५ मध्यें 1