पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. असारत्व व मानवी जीविताचें क्लेशमयत्व; हीं दोन्हीं तत्वें पुढल्या दासबो- धांत फारच क्वचित् दृष्टीस पडतात. उलट आतां रामदास मानवी जीवि ताची थोरवी गाऊं लागतात; तसेच आयुष्यांतील दुःखपीडा इत्यादींची बभक चित्रेही ते पुढल्या भागांत काढीत नाहींत; तर मनुष्यानें प्रथमतः "संसार नीटनेटका करावा, प्रपंच साधल्याशिवाय परमार्थाला लागणें व्यर्थ आहे, या जगांतील आपली कर्तव्यकमें नीतिन्यायानें करणें हेंच परमार्थाचें खरें साधन आहे; मनुष्यानें दैवावर हवाला ठेवून बसतां कामा नये; तर आळस टाकून प्रयत्नाची कास धरावी तरच प्रपंच व संसार नेटका होऊन परलोकींही सद्गति मिळेल. सारांश नेहमींचा निवृत्तिपर वेदांत न शिक वितां रामदासांनी पुढल्या दासबोधांत प्रवृत्तिपर वेदांत शिकविला आहे. हाच त्यांच्या दुसऱ्या भागांतील उपदेशाचा एक विशेष आहे. यामुळेच त्याकाळाला अनुरूप अशा एकीचा सहकार्याचा, लोकसेवेचा समुदायकार्याचा स्वार्थत्यागाचा लोकसंग्रहाचा उपदेश दासबोधांत वारंवार केलेला दिसतो व हाच उपदेश हल्लांच्या काळीही आपल्या देशाला पाहिजे असल्यामुळे रामदासांची असली किती वचनें तरी अर्वाचीन लेखांतून दृष्टीस पडतात. रामदासांच्या काळी शिवाजी महाराजांचा स्वराज्यस्थापनेचा उद्योग चालू होता. अर्थात् रामदासांच्या व्यावहारिक उपदेशाचा कल राजकीय बाब तींकडे वळला यांत नवल नाहीं व म्हणूनच दासबोधांत राजकारण हें एक आयुष्याचें ध्येय आहे असे सांगितलेले आहे. पुढे पुढे रामदासांनीं आपला दासपंथ काढला व त्यांचा शिष्यसांप्रदाय फार वाढला; त्यानीं जागोजाग दासपंथाचे मठ स्थापन केले. यामुळे मागें उल्लेख केलेला व त्या त्या ठिकाणी उद्धत केलेला व्यावहारिक उपदेश हा दासपंथी लोकांना व त्यांच्या मठ पतींना केलेला दिसतो व त्यातही राजधोरणी व राजकारणी असा उपदेश बराच आहे. या उपदेशावरून रामदासांचे शिष्य म्हणजे सर्व शिवाजचे हेर होते; शिवाजी व रामदास यांचा राजकीय हेतु स्वराज्य- स्थापनेचा होता इतकेच नव्हे तर शिवाजीला राजकीय ध्येयाची स्फूर्ती रामदासांनी करून दिली व म्हणून रामदास म्हणजे एक राजकीय साधु होते; ते धार्मिक साधु नव्हते; उगैरे कल्पना निघालेल्या दिसतात. पण ७७