Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ सज्जनगड व समर्थ रामदास. पंथ काढला तो ब्राह्मण मंडळींना वारकरी पंथापासून परावृत्त करण्या- करितां काढला की काय अशी केव्हां केव्हां शंका येते. पण त्याबद्दल दासबोधावरून कांहींच ठरवितां येत नाहीं. आध्यात्मिक दृष्टीने विचार करितां या रामभक्ति भेदाखेरीज दुसऱ्या बाबतींत पूर्वीचे साधुसंत व राम- दास यांचेमध्यें फरक नाहीं असे म्हणणें प्राप्त आहे. पण ही गोष्ट दासबोधाच्या पहिल्या सात दशकांनाच लागू आहे; पुढल्या दशकांत व्यावहारिक व वेदांत मतार्शी कांहींसा विरोधी असा उपदेश आहे हें खरें आहे. तेव्हां त्या उपदेशाच्या स्वरूपाकडे आपण आतां वळू. हल्लींचा वीस दशकी दासबोध हा रामदासांनीं प्रथमतः एकदम मनांत कल्पिलेल्या संकल्पाचें दृश्य स्वरूप नाहीं; तर पाहले सात दशक एकदम एका कल्पनेनें एकसूत्री धोरणाने लिहिलेले आहेत; प्रथमतः येवढाच दासबोध रामदासांनी लिहिला असावा; नंतर कांहीं कालानें आठवा दशक स्वतंत्र ज्ञानदशक म्हणून लिहिला असावा व पुढले पुढले दशक प्रसंगानुसार रचले गेले असावे व मग ते मूळच्या दासबोधाला जोडले गेले असावे व म्हणूनच सातांनतरच्या दशकांत कितीतरी विचा- रांची व उपदेशांची द्विरुक्ति झालेली आहे; पहिल्या सातांप्रमाणे या दश.. कांत एकसूत्री संगत विचारसरणी दिसून येत नाहीं. या वरून हल्ली उप- लब्ध असलेला दासबोध रामदासांनीं निरनिराळ्या मनःस्थितींत लिहिला असावा असे दिसतें. अर्वाचीन काळचें रामदासीपंथाचें सर्व वाङ्मय प्रसिद्ध करणारे सत्कार्योत्तेजकसभेचे उत्साही प्रवर्तक रा. देव यानींही आपल्या दासबोधाच्या प्रस्तावनेंत ही कल्पना काढून त्याला आपल्या पुराव्यासकट पाठिंबा दिला आहे. तेव्हां याबद्दल अधिक विवेचन न करतां मागें सांगितल्याप्रमाणे या मागाहून लिहिलेल्या दासबोधातील उप- देशाच्या विशेष स्वरूपाचें निरीक्षण करूं. हें विशेष स्वरूप म्हणजे उपदेशाचा व्यावहारिकपणा हे होय. हा ग्यावहारिकपणा आणण्याकरितां रामदासांना आपल्या आध्यात्मिक पंच- •तत्वांपैकी दोन तत्वें टाकावीं लागली आहेत. ती तत्वें म्हणजे संसाराचें "