पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. ५७ त्यांत रामदासांनी ध्यान, परब्रह्म व माया या तिहींचें स्वरूपवर्णन दिलें आहे. त्यांत मायेचें स्वरूप वर्णन करतांना खालील ओवी आहे. मुळीं बालविधवा नारी । तिचे नांव जन्मसावित्री । कुबेर हिंडे घरोघरीं । तैसी माया ॥ पंधराव्या दशकांत सामान्यतः रामदास आपल्या वेदांती तत्वाचेंच पुनः विवरण करण्यास लागले आहेत असे दिसतें. मात्र पहिले तीन समास व सहावा समास यांमध्यें चातुर्यलक्षण, निस्पृहलक्षण व आत्म- निरीक्षण या नांवाखालीं व्यावहारिक उपदेश केला आहे व तो संबंध चवदाव्या समासाप्रमाणे आपल्या रामदासी पंथांतील लोकांना केल्या- सारखा दिसतो. त्यांत पुष्कळ गोष्टी गुप्तपणे कराव्या व केल्याचा लोकांना सुगावा लागूं देऊं नये व राजकारण करावें, लोकांची मनें राजी राखावीं वगैरे रचे उद्गार आले आहेत बहुधा अशासारख्या उद्गारां- वरून रामदास मोठे मुत्सद्दी असले पाहिजेत, त्यांच्याच स्फूर्तीने सर्व महाराष्ट्रांत राजकारण सुरु झाले असले पाहिजे; रामदासी पंथ म्हणजे एक राजकीय पंथ असला पाहिजे वगैरे कल्पना निघाल्या असाव्यात असे वाटतें. पण या अपवादात्मक व संशयात्मक उद्गारांवरून इतकीं खोल खोल अनुमानें काढणें रास्त आहे किंवा नाहीं हें ठरविणे कठीण आहे. कांहीं उद्गारांवरून तर त्यांना हें राजकारण पसंत नसावें की काय असाही भास होतो. या चार समासांतले मुद्दयाचे व मासलेवाईक उतारे एकत्र येथें देतो. त्यांवरून निघणा-या अनुमानांचे विवेचन दासबोधाच्या सार- समाप्तीनंतर करावयाचें आहे. + या कारणें मुख्यमुख्य । तयासी करावें सख्य | येणेंकरितां असंख्य । बाजारी मिळती ॥ धूर्तासि धूर्ताच आवडे । धूर्त धूर्तीच पवाडे । उगीच हिंडती वेडे । कार्येविण ।। धूर्तासि धूर्तपण कळलें । तेणें मानसीं मन मिळालें । परि हें गुप्तरूपें केलें । पाहिजे सर्व ॥ समर्थाचें राखितां मन । तेथें येती उदंड जन ।