Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
सज्जनगड व समर्थ रामदास.

जो दुसऱ्याचें अंतर जाणें । देशकाळ प्रसंग जाणें ।
तया पुरुषा काय उणें । भूमंडळीं ॥
नीच प्राणी गुरुत्व पावला । तेथें आचारचि बुडाला ।
वेदशास्त्र ब्राह्मणाला । कोण पुसे ॥
ब्रह्मज्ञानाचा विचारु । त्याचा ब्राह्मणासीच अधिकारु ।
'वर्णाना ब्राह्मणो गुरुः' । ऐसें हें वचन ||
ब्राह्मण बुद्धीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले ।
गुरुत्व सांडून झाले । शिष्य शिष्याचे ||
कित्येक दावलमलकास जाती । कित्येक पिरासी भजती ।
कित्येक तुरुक होती । आपुले इच्छेनें ॥
ऐसा कलीयुगीं आचार । कोठें राहिला विचार ।
पुढें पुढें वर्णसंस्कार । होणार आहे ||
गुरुत्व आलें नीच याती । कांहीं एक वाढली महंती ।
शूद्र आचार बुडविती । ब्राह्मणांचा ॥
हें ब्राह्मणांस कळेना । त्याची वृत्ति च वळेना ।
मिथ्या अभिमान गळेना | मूर्खपणाचा ||
राज्य नेलें म्लेंच्छक्षेत्रीं । गुरुत्व नेलें कुपात्रीं ।
आपण अरत्रींना परत्रीं । कांहींच नाहीं ॥
ब्राह्मणांस ग्रामण्यानें बुडविलें । विष्णूनें श्रीवत्स मिरवलें ।
त्याच विष्णूनें शापिलें । परशुरामा ||
आम्हीही तेचि ब्राह्मण | दुःखें बोलिलों हें वचन |
वडील गेले ग्रामणी करून । आम्हां भोंवते ॥
आतांच्या ब्राह्मणी काय केलें । अन्न मिळेना ऐसें झालें ।
तुम्हां बहुतांचे प्रचीतीस आलें । किंवा नाहीं ॥
बरें वडिलांस काय म्हणावें । ब्राह्मणांचें अदृष्ट जाणावें ।
प्रसंग बोलिलों स्वभावें । क्षमा कीजे ॥

 या दशकाचे शेवटचे तीन अध्याय मात्र पुनः अध्यात्मपर आहेत व--