पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ सज्जनगड व समर्थ रामदास. केलें आहे. या समासाच्या ओव्याही इतर बहुतेक सर्व समासांपेक्षा संख्येनें जास्त आहेत. निस्पृहाच्या या वर्णनावरून निस्पृह म्हणजे आपल्या पंथानें चालणारा विरक्त मनुष्य असाच अर्थ रामदासांनीं केल्यासारखा दिसतो. एकदां निस्पृहता धरली म्हणजे ती सोडूं नये; नेहमी फिरत राहावें; भिक्षा मागावी, देवाची पूजा अर्चा करावी; मनोविकार आंवरावे; दुर्गुण लागूं देऊं नयेत, गर्विष्ठ असूं नये; द्रव्याकरितां कीर्तन करूं नये; राजाच्या येथे कारभारी किंवा कामगार होऊं नये; प्रपंच करूं नये, मोलानें पुजारी होऊं नये; वगैरे तऱ्हेचा उपदेश रामदासांनी केला आहे. अशा कृत्यांनी महंतपणा अंगी येतो असें रामदासानीं शेवटी म्हटले आहे. या समासांत मठे असा शब्द आला आहे व निस्पृहानें मठ स्थापूं नये; स्थापल्यास आपण तरी मठपति होऊं नये असा उपदेश केला आहे. महंत व मठपति या दोन शब्दांवरून व एकंदर उपदेशावरून सर्व दशक रामदासी पंथाच्या लोकांकरितां लिहिलेला आहे अशी खातरी होते व ही खातरी दुसऱ्या समासांतील विषयानें दृढतरच होते. कारण दुसऱ्या समा सांत भिक्षेचें महत्त्व गाइले आहे. तिसऱ्या समासांत कवित्वाचें लक्षण दिले आहे व त्यावरून दासबोधाच्या प्रारंभीच्या कविवर्णनाच्या समासाची आठवण होते. कारण दोन्ही ठिकाण पुष्कळ विचारैक्य दिसून येतें. · चवथ्या समासांत कलियुगों कीर्तन करावें असे प्रतिपादन केले आहे व यांत अनुप्रास व त्याच त्याच शब्दांची मालिका ओव्यांत आणण्याचा. प्रयत्न केला आहे, यामुळे ओव्या केव्हां केव्हां अर्थहीन झाल्या आहेत.. दासबोधासारख्या गंभीर ग्रंथाला शोभण्यासारखी. या समासाची कवन- पद्धती दिसत नाहीं. पण अशा तऱ्हेच्या कविता रामदासांचीं स्फुट प्रकरणें म्हणून जी कविता छापली आहे त्यांत पुष्कळ आहेत. नाना नाटक नेटकें | नाना मानें तुकें कौतुकें । नाना नेमक अनेकें । विद्यापात्रें || पांचव्या समासांत हरिकथा कशी करावी याचें विवेचन केले आहे.. त्यांतील एक उतारा येथें देतों.