पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. वेड्यास वेडे म्हणूं नये । वर्म कदापि बोलूं नये । तरीच घडे दिग्विजये । निस्पृहासी ॥ उदंड स्थळी उदंड प्रसंग । जाणोनि करणें यथासांग | प्राणिमात्राचा अंतरंग | होऊन जावें ॥ मनोगत राखों न जातां । परस्परें होय अवस्था | मनोगत तोडितां व्यवस्था । वरी नाहीं ॥ याकारणें मनोगत | राखेल तो मोठा महंत । मनोगत राखतां समस्त । वोढोन येती ॥ चवदावा दशक आतांपर्यंत वर्णिलेल्या दशकांपेक्षां अगदीं निराळा आहे. पूर्वीच्या बऱ्याच दशकांत वेदांत मताचा उल्लेख वारंवार आलेला आहे व पुष्कळ ठिकाणी तर पुनरुक्तीचा दोष त्या दशकांवर आल्याखेरीज रहात नाहीं. पण या चवदाव्या दशकांत शेवटच्या दोन समासांत फक्त ब्रह्म व माया हे शब्द आले असून त्यांचें विवेचन केले आहे. बाकीच्या आठी समासांत घड व्यावहारिक नाहीं धड आध्यात्मिक नाहीं अशा तऱ्हेचा उपदेश आहे. या समासांतील कित्येक विचार मागील समासांतील विचारांशी विसंगत आहेत. यावरून हा उपदेश सर्वसामान्य जनांना केलेला दिसत नाहीं तर रामदासांनी आपला स्वतंत्र रामदासी पंथ केल्या- नंतर या रामदासी पंथांतील लोकांना केल्यासारखा दिसतो. ५३ कारण रामदासी पंथाच्या लोकांचे भिक्षा, कीर्तन, हरिकथा, कवित्व, ‘वगैरे व्यवसाय होते व त्यांचेंच पहिल्या समासांतून वर्णन आले आहे. या दशकांतच तत्कालीन सामाजिक गोष्टींचा उल्लेख जास्त प्रमाणांत आला आहे. आतांपर्यंत ठराविक व नेहमींचा वेदांतपर किंवा व्यावहारिक उप- देश या पलीकडे तत्कालीन गोष्टींचा उल्लेख क्वचितच आला आहे. पण या दशकाची तशी गोष्ट नाहीं. तेव्हां हा दशक रामदासांनी निराळ्याच एका मनःस्थितीत लिहिला असावा असे दिसतें. अशी मनःस्थिति जर इतर दशके लिहितांना राहिली असती तर दासबोध या मोठ्या ग्रंथावरून किती तरी सामाजिक तत्कालीन गोष्टी कळल्या असत्या असे वाटतें असो. पहिल्या समासांत निस्पृह मनुष्याचें स्वरूपवर्णन बरेंच सविस्तरपणे S