पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. या दशकाचे शेवटचे दोन समास पहिल्या दोहोंप्रमाणें प्रवृत्तिपर व व्यवहारविषयक आहेत. नवव्या समासांत मनुष्यानें रोजचें वर्तन कशा तऱ्हेनें ठेवावें हें सांगितले आहे व शेवटल्या समासांत मनुष्यानें दुसऱ्यावर परोपकार करावा, त्याच्याशीं सलोख्यानें वागावें; त्याला दुरुत्तरें देऊं नयेत, व नेहमी चांगले काम करीत रहावे असे सांगितले आहे व 'बोले तैसा चाले त्याचीं वंदावीं पाऊलें' या तुकारामाच्या प्रसिद्ध उक्तीचा अनुवाद केला आहे. बोलण्यासारखें चालणें । स्वयें करून वोलणें । तयांचीं वचनें प्रमाणें । मानिती जनीं ॥ तेराव्या दशकाच्या पहिल्या चार समासांत आध्यात्मिक विषयाची मांडणी व्यवस्थेशीर आहे. पहिल्या समासांत मानवी आत्म्याचें वर्णन आहे. शरीराच्या सर्व हालचालीचा, इन्द्रियांच्या प्रवृत्तीचा, मानसिक गुण- दोपांचा व कृत्यांचा आत्मा देहाच्या संयोगानें चालक आहे असे प्रतिपादन केले आहे. दुसऱ्या समासांत या आत्म्यानें सारासार विचार केला म्हणजे सोहं तत्वमसि ' या तत्वाचें ज्ञान आत्म्यास होते असे सांगितले आहे. तिसऱ्या व चवथ्या समासांत ब्रह्मापासून मायेच्या द्वारें, सृष्टीची रचना कशी होते ती वर्णिली आहे व पुढे ती सृष्टि प्रलयकाळ कशी नाश पावते तें निवे- दन केले आहे. मागें ज्याप्रमाणें सबंध दशकांत एका माणसाचा जीवनवृत्तांत निवेदन केला आहे त्या सारखीच पांचव्या एका समासांत लहानशी कहाणी सांगि- तली आहे. मात्र मानवी आयुष्याची दुःखरूप काळी बाजू येथें भडक रंगांत रंगविली नाहीं. साहाव्या समासांत थोडक्यांत पंच महाभूतें यांच्या व्याख्या, त्यांचा नाशवंतपणा, आत्म्याचा शाश्वतपणा, विवेकानें परमात्म्याचें व जीवात्म्याचें • समजणारें ऐक्य व शेवटीं ज्ञानी माणसाची थोरवी इतक्या गोष्टी वर्णिल्या आहेत व म्हणून या समासास लघुबोध असें अन्वर्थक नांव दिले आहे. शिवाजीमहाराजास शिंगणवाडी येथें समर्थ रामदासांनी हा लघुबोध केला अशी आख्यायिका आहे..